माए साई - थायलंडच्या गुहेतून आणखी चार मुलांना बाहेर काढण्यात नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांना सोमवारी यश आले असून, आता गुहेमध्ये केवळ चार मुले आणि त्यांचा फुटबॉल प्रशिक्षक असे पाच जण अडकलेले आहेत. गुहेमध्ये अडकलेल्या फुटबॉल संघातील चार विद्यार्थ्यांना रविवारी बाहेर काढण्यात आले होते.बाहेर काढलेल्या चारही मुलांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करून मगच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. काल ज्या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात आले, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुहेबाहेर रुग्णवाहिका तसेच हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहे. ही मुले दोन आठवड्यांपासून त्या गुहेमध्ये अडकली आहेत. सर्व मुलांचे पालक गुहेबाहेर आहेत.
गुहेत अडकलेल्या आणखी चार मुलांची झाली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:33 IST