शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : चार सिंहाना कोरोनाने गाठले; मोठ्या झूमध्ये खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:53 IST

CoronaVirus News: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सगळीकडे भीतीचे वातावरण असताना पाळीव प्राण्यांना, पक्षांना कोरोना झाल्यास काय, असा प्रश्न पडला होता. यावर अनेकदा संशोधन करून भीती नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता सिंहांना कोरोना झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

प्राण्यांपासून माणसाला झालेला कोरोना आता पुन्हा प्राण्यांमध्ये पसरू लागला आहे. स्पेनच्या बार्सिलोना शरहरातील एका प्राणी संग्रहालयात चार सिंह कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याशिवाय या प्राणी संग्रहालयातील  दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सगळीकडे भीतीचे वातावरण असताना पाळीव प्राण्यांना, पक्षांना कोरोना झाल्यास काय, असा प्रश्न पडला होता. यावर अनेकदा संशोधन करून भीती नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता सिंहांना कोरोना झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

जाला, नीमा आणि रन नावाच्या तीन सिंहीनींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. तर कियुंबे नावाच्या सिंहामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. जेव्हा या चारही सिंहांची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. आता य़ा प्राणी संग्रहालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला याची चौकशी केली जात आहे. यानंतर या सिंहांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. पैकी दोन कर्मचारी कोरोना बाधित सापडले आहेत. 

सिंहांची माणसाप्रमाणेच स्टँडर्ड पीसीआर स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. हे सिंह कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्या परंतू कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कोणत्यातरी कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने कोरोना झाला असावा, असे म्हटले जात आहे. या प्राणी संग्रहालयाने म्हटल्यानुसार या सिंहाना अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग दिली जात आहेत. तसेच त्यांचे निरिक्षणही केले जात आहे. सौम्य लक्षणे असल्याने या सिंहांची सामान्य फ्ल्यू सारखीच देखभाल केली जात आहे. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत आहे. 

या प्राणीसंग्रहालयात जे लोक येतात त्यांचे या सिंहांच्या संपर्कात येण्याची शक्यता तशी फार कमी आहे. कारण सिंह हा हिंस्त्र प्राणी आहे. यामुळे या लोकांना कोरोनाचे संक्रमन होण्याचा धोका खूप कमी आहे. तरीही काळजी घेतली जात आहे.

अमेरिकेशी संपर्कातबार्सिलोनाचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात असलेल्या ब्रॉन्क्स झूमध्ये संपर्क साधला आहे. या प्राणीसंग्रहालयातील चार वाघ, आणि तीन सिंहांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. स्पेनआधी अमेरिकेत पहिला प्रकार समोर आला होता. या झू मधील सर्व वाघ आणि सिंह आता कोरोनातून बरे झाले आहेत. नाडिया नावाचा वाघ पहिल्यांदा कोरोनाबाधित झाला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या