शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:46 IST

पाकिस्तानमध्ये चार हिंदू मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले असून मुलीच्या आईने जबरदस्तीने धर्म बदलल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. येथील शहदादपूरमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. २२ वर्षीय जिया बाई, २० वर्षीय दिया बाई आणि १६ वर्षीय दिशा बाई यांच्याव्यतिरिक्त, या तीन बहिणींचा १३ वर्षीय भाऊ हरजीत कुमार याचे अपहरण करून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुलांची आईने न्यायाची मागणी केली आहे.

Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. शाहदादपूर येथे एका हिंदू कुटुंबातील चार भावंडांचे अपहरण झाले होते. पीडितांच्या आईने स्थानिक संगणक शिक्षक फरहान खासखेलीवर मुलांना आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप केला. "मला तीन मुली होत्या आणि फरहानने त्या सर्वांना घेऊन गेला," असे तिने डोळ्यात अश्रू आणत सांगितले. आईने तिच्या १३ वर्षांच्या मुलाला परत आणण्याची विनंती केली,  यावेळी त्या म्हणाल्या की, इतक्या लहान वयात धर्म समजू शकत नाही. तिने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या मुलांचे तथाकथित "धर्मांतर" दाखवले आहे, याला अनेकांनी "सांस्कृतिक दहशतवाद" म्हटले आहे. हिंदू पंचायत प्रमुख राजेश कुमार यांनी ही घटना केवळ कौटुंबिक शोकांतिका नसून एक सामुदायिक आपत्ती असल्याचे म्हटले. त्यांनी पीडितांचे फोटो शेअर केले आहेत. 'ही मुले स्वेच्छेने धर्म बदलण्याचा निर्णय घेण्याइतकी प्रौढ आहेत का?', असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पोलिसांची कारवाई आणि पाक मीडियाचा दावा

पाकिस्तानी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, कुटुंबाच्या निषेधानंतर पोलिसांनी या मुलांना शहदादपूर येथील न्यायालयात हजर केले. दोन प्रौढ मुलींना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले, तर एका अल्पवयीन मुली आणि मुलाला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पाक मीडियाचा दावा आहे की या चार भावंडांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने धर्म बदलला आहे. पोलिसांच्या दबावामुळे मुले घाबरली आहेत असे कुटुंबाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत