शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाक हादरले! इम्रान खान यांच्यावर गाेळीबार; पायाला लागली गाेळी, हल्लेखाेर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 06:19 IST

गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांचा लाँग मार्च वजिराबाद येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर तेथील पंजाब प्रांतातील वजिराबाद येथे लाँग मार्चमध्ये  हल्लेखोराने गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या गोळीबारात पीटीआय पक्षाचे एक खासदार फैसल जावेद यांच्या समवेत दाेनजण जखमी झाले आहेत. 

गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांचा लाँग मार्च वजिराबाद येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पीटीआयचे नेते इम्रान इस्माईल यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्या दिशेने हल्लेखोराने पिस्तुलाद्वारे नजीकच्या अंतरावरून गोळीबार केला. या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान खान यांच्या हत्येचा गुरुवारी प्रयत्न झाला. त्यासंदर्भातील घटनांवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

कुणामुळे वाचले इम्रान?

इम्रान खान यांच्यावर हल्लेखोराने गोळीबार सुरू केला, त्यावेळी गर्दीत उभा असलेला तरुण समर्थक फरिश्ता ठरला. त्याने हल्लेखोराचा मागून हात धरला आणि त्याचे लक्ष्य चुकले.हल्लेखाेर पळून जात असताना त्या तरुणाने त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. या सगळ्या थराराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर त्या तरुणासाठी ‘पाकिस्तानचा खरा हिरो, सुपरस्टार ऑफ द डे’ असे हॅशटॅग वापरून लोक कौतुक करत आहेत.

अशी झाली हाेती बेनझीरची हत्या

या प्रसंगामुळे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्ताे यांच्या हत्येच्या घटनेची सर्वांना आठवण झाली. २७ डिसेंबर २००७ रोजी भुत्तो यांची रावळपिंडी येथील जाहीर सभेत गोळ्या झाडून हत्या झाली हाेती. आत्मघाती स्फोटही घडविला.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान