शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात लाहोरच्या पोटनिवडणुकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पत्नी कुलसूमचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 11:17 IST

पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ  पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर लाहोरमधल्या पोटनिवडणुकीकडे सगळयांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देकुलसूम शरीफ विजयी झाल्या असल्या तरी, त्यांचे मताधिक्क्य घटले आहे. तुम्ही फक्त निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यानाच नव्हे तर, अनेक अदृश्य शक्तींचा पराभव केला आहे.

इस्लामाबाद, दि. 18 - पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ  पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर लाहोरमधल्या पोटनिवडणुकीकडे सगळयांचे लक्ष लागले होते. या पोटनिवडणुकीत नवाझ यांची पत्नी कुलसूम शरीफने बाजी मारली आहे. 2018 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्याआधी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शरीफ यांना पुढची निवडणूक आपल्यासाठी कशी असेल याची चाचपणी करता आली. 

कुलसूम शरीफ विजयी झाल्या असल्या तरी, त्यांचे मताधिक्क्य घटले आहे. इतर निवडणुकीच्या निकालांप्रमाणे हा एक सामान्य विजय नाहीय. पीएमएल-एनच्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. त्यांचे अपहरण झाले होते तरीही कुलसूम विजयी झाल्या असे शरीफ यांची मुलगी मरीअमने सांगितले. तुम्ही फक्त निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यानाच नव्हे तर, अनेक अदृश्य शक्तींचा पराभव केला आहे असे मरीअमने म्हटले आहे. 

कुलसूम निवडणूक लढवत असल्या तरी, त्या प्रचारात सक्रीय नव्हता. त्यांच्यावर लंडनमध्ये कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. लाहोरचा मतदारसंघ शरीफ कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. कुलसूम यांना 53.5 टक्के मते मिळाली. 2013 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाला इथे 61 टक्के मते मिळाली होती. सध्या शरीफ कुटुंबातच राजकीय संघर्ष सुरु आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांचे बंधु शहाबाज शरीफ यांच्याकडे नवाझ यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. पण आता पाकिस्तानात नवाझ शरीफ यांनी स्वत:च आपले बंधू शहाबाज शरीफ यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवले. नवाझ शरीफ यांनी आपले बंधू शहाबाज यांनाच दूर ठेवले नाही तर, शहाबाज यांचा मुलगा हमझा शरीफचेही स्वप्न मोडले. शहाबाज यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर पंजाब प्रातांची जबाबदारी आपल्याला मिळेल असा हमजा याचा कयास होता. पण पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांच्या निवडीमुळे तूर्तास पिता-पुत्राचे स्वप्न भंगले आहे. हाबाज संसदेवर निवडून जाईपर्यंत फक्त 45 दिवसांसाठी शाहीद अब्बासी पाकिस्तानचे पंतप्रधान असतील असे सांगण्यात येत होते. 

 

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफ