शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरीफांना मिळाली नोकरी; आता 'हे' काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 21:33 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पंजाब प्रांतातील त्यांची मुलगी मरियम नवाज यांच्या सरकारमध्ये नवी जबाबदारी मिळाली आहे. पंजाब सरकारने तीन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांची लाहोर हेरिटेज रिव्हायव्हल अथॉरिटी (LAHR) चे मुख्य संरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवाज आता लाहोरमधील अनेक वसाहतकालीन इमारतींच्या पुनरुज्जीवनावर देखरेख करणार आहेत.

पीटीआयने घेतला खरपूस समाचार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझच्या अध्यक्षांची खरडपट्टी काढली आणि सरकारी 'नोकरी' मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे वरिष्ठ नेते शौकत बसरा यांनी गुरुवारी म्हटले की, 2024 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या अपमानास्पद पराभव झाला. पण, इम्रान खान यांचा जनादेश हिरावून घेतला आणि नवाज आणि झरदारी यांच्या पक्षांना देण्यात आला.

नवाझ शरीफ निवृत्त जीवन जगत होते. पण, आता मुलगी आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियमने त्यांना काही काम दिले आहे. निवृत्त राजकारणी या नात्याने जुन्या इमारतींचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामात व्यस्त राहिल्यास नवाझ यांची तब्येत बरी राहील, असा टोला त्यांनी नवाझ शरीफ यांना लगावला. 

काय म्हणाले नवाझ शरीफ?दरम्यान, नवाझ शरीफ यांनी लाहोरचा वारसा पुनर्संचयित करण्यासाठी वॉलड सिटी अथॉरिटी लाहोरकडे सर्वसमावेशक योजना मागितली आहे. शरीफ म्हणाले, जुना लाहोर सुंदर आहे आणि त्याचे मूळ रूप परत आणले पाहिजे. आपला गमावलेला वारसा जतन करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

नवाझ शरीफ यांचा राजकीय प्रवासनवाझ शरीफ यांनी 1980 च्या दशकात पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून राजकारणात प्रवेश केला. शरीफ 1990 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. पण, राष्ट्रपती गुलाम इशाक खान यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी 1993 मध्ये राजीनामा दिला.

1997 मध्ये नवाझ शरीफ यांनी दुसऱ्यांदा सत्ता हाती मिळवली. या कार्यकाळात त्यांनी अणुचाचण्या (1998) करून पाकिस्तानला अणुशक्ती देश बनवले. यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. परंतु, 1999 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सत्तापालट करून त्यांचे सरकार हटवले आणि त्यांना देश सोडण्यास भाग पाडले गेले.

2013 मध्ये नवाझ शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या कार्यकाळात त्यांनी CPEC (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) सारखे प्रकल्प सुरू केले. परंतु 2017 मध्ये पनामा पेपर्स प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले आणि पदावरून हटवले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफ