शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन हे तर देशद्रोही; पॉम्पिओ यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:02 IST

बोल्टन यांचाही पलटवार; ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र नाहीत

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन व माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्यातील वाक्युद्धामध्ये विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी उडी घेतली असून, बोल्टन हे देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. बोल्टन यांनी त्यांच्यावरील विश्वासाला तडा दिला असून, अमेरिकेच्या हिताला धक्का पोहोचवला आहे, असेही म्हटले आहे.एकीकडे बोल्टन यांच्यावर विविध नेते हल्लाबोल करीत असताना त्यांनीही एकामागून एक टष्ट्वीट करीत ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कसे पात्र नाहीत, हे दाखविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.बोल्टन यांनी एक पुस्तक लिहिले असून, त्यात अनेक गोपनीय बाबींचा पर्दाफाश केला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी चीनचे त्यांचे समपदस्थ शी जिनपिंग यांच्याकडे मदत मागितली होती, असेही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. त्याला उत्तर देताना पॉम्पिओ यांनी म्हटले आहे की, पुस्तकातील काही अंश वाचल्यानंतर माझी खात्री झाली आहे की, बोल्टन हे अनेक प्रकारची खोटी माहिती प्रसारित करीत आहेत. बोल्टन यांची भूमिका देशद्रोह्यासारखी वाटते, ही दु:खद व धोकादायक बाब आहे.‘द रूम व्हेअर इट हॅपण्ड : अ व्हाईट हाऊस मेमोअर’ या नावाचे पुस्तक बोल्टन यांनी लिहिले असून, त्याची विक्री २३ जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी बोल्टन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून मागील वर्षी हटवले होते. त्यांच्याकडून मोठ्या चुका झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. बोल्टन यांच्या दाव्यानुसार, २९ जून २०१९ रोजी जपानच्या ओसाकामधील जी-२० शिखर संमेलनात ट्रम्प यांनी जिनपिंग यांनी भेट घेतली होती. त्यावेळी इतर चर्चा करताना ट्रम्प यांनी आपल्या दुसºया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिनपिंग यांची मदत मागितली होती, असा दावा केला होता. त्याचबरोबर चीनविरुद्धची ट्रम्प यांची कठोर भूमिका किती काळापर्यंत टिकेल, याबाबतही बोल्टन यांनी पुस्तकात साशंकता व्यक्त केली होती. त्यावर ट्रम्प यांनी यापूर्वीच आपले मत व्यक्त केले असून, बोल्टन हे खोटारडे आहेत. ते माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हा उपद्व्याप करीत आहेत, असेही म्हटले होते.पुस्तक प्रकाशन थांबविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरूसंपूर्ण जगभरात खळबळ उडवून देणारे जॉन बोल्टन यांचे पुस्तक प्रकाशित होऊन लोकांच्या हातात पडू नये यासाठी ट्रम्प प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. वॉशिंग्टन जिल्हा न्यायालयात याबाबत खटला दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे पुस्तकाच्या हजारो प्रती विक्रेत्यांपर्यंत पोहोचलेल्या असताना ही कारवाई सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन