शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

अमेरिकेच्या ओरेगॉनमधील जंगलांत आग, ५ लाख नागरिकांना हलविण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 00:11 IST

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक अँड्र्यू फेल्प्स यांनी सांगितले की, आम्ही मृतदेहांचा शोध घेत आहोत. आगीत हजारो इमारती नष्ट झाल्या आहेत.

सलेम (अमेरिका) : अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यांतील जंगलांत दोन ठिकाणी मोठ्या आगी लागल्या आहेत. त्या नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रणा लढत असतानाच या राज्याच्या गव्हर्नरांनी सांगितले की, राज्याच्या इतर भागात कित्येक लोक बेपत्ता आहेत.राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक अँड्र्यू फेल्प्स यांनी सांगितले की, आम्ही मृतदेहांचा शोध घेत आहोत. आगीत हजारो इमारती नष्ट झाल्या आहेत.ओरेगॉनच्या गव्हर्नर केट ब्राऊन यांनी सांगितले की, राज्यातील ४0 हजार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. ५ लाख लोकांना हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यापैकी काहींना घरे सोडण्यासही सांगण्यात आले आहे, तर काहींना घरे सोडण्याची तयारी ठेवा, असे सांगण्यात आहे.ब्राऊन यांनी सांगितले की, जॅक्सन परगणा तसेच मॅरियन परगणा येथे आगीचा भीषण भडका उडाला आहे. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले की, दोन मोठ्या आगी पूर्वेला आणखी दूरवर पसरण्यापासून रोखण्यात यश आले आहे. हवामानातील बदल, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि हवेत अचानक वाढलेली आर्द्रता याचा अग्निशामक दलास फायदा झाला.आग लावणाºया एकास अटकअमेरिकेतील जंगलांत भडकलेल्या आगी नैसर्गिक आहेत की, मानवनिर्मित यावरून उलटसुलट चर्चा होत असतानाच दक्षिण ओरेगॉनमध्ये जंगलात आग लावून वणव्याची सुरुवात केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.कन्व्हेन्शन सेंटरमध्ये निवारागृहस्थलांतरितांना आश्रय देण्यासाठी पोर्टलँडमधील ओरेगॉन कन्व्हेन्शन सेंटरचे रूपांतर निवारागृहात करण्यात येत आहे. आगीमुळे वातावरणात प्रचंड धूर साचला असून पोर्टलँडमधील हवेची गुणवत्ता प्रचंड घसरली आहे. पोर्टलँडच्या दक्षिण उपनगरातील महिला कारागृहातील १,३00 कैद्यांना अन्यत्र हलविण्यात आल्याचे ओरेगॉनच्या सुधारणा विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :Americaअमेरिका