शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:51 IST

इराणचे मंत्री सैयद अब्‍बास अराघची हे पाकिस्तानला पोहोचले आहेत. दोन दिवस ते पाकिस्तानी नेत्यांशी पश्चिम आशियातील तनावावर चर्चा करणार आहेत.

येत्या काही दिवसांत इराण हा देश इस्रायलवर हल्ला चढविण्याच्या तयारीत आहे. इराणने आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. अंतर जास्त असल्याने इराकची भूमी देखील वापरली जाण्याची शक्यता आहे. अशातच इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याने जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. 

इराणचे मंत्री सैयद अब्‍बास अराघची हे पाकिस्तानला पोहोचले आहेत. दोन दिवस ते पाकिस्तानी नेत्यांशी पश्चिम आशियातील तनावावर चर्चा करणार आहेत. पाकिस्ताननुसार ते व्यापार, उर्जा आणि संरक्षण यावर चर्चा करणार आहेत. पाकिस्तानी मिडीयानुसार इस्रायलच्या हवाई हल्ला आणि तेहरानच्या प्रत्यूत्तर याच काळात ते पाकिस्तानात आल्याने मोठा संदेश दिला जात आहे. इराण या हल्ल्यापूर्वी आपल्या भागातील देशांना एकत्र आणण्याच्या कामी लागला आहे.

इस्रायलसोबत युध्द सुरु झाल्यास पाकिस्तान काही नवीन संकट निर्माण तर करणार नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी इराणने दौरा आखला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामनेई यांनी इस्रायल आणि अमेरिकेला जोरदार उत्तर दिले जाईल असे म्हटले होते. पाकिस्तानने इस्रायल हल्ल्यावेळी इराणची बाजू घेत निषेध व्यक्त केला होता. पीएम शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान इराणसोबत उभा असल्याचे वक्तव्य केले होते. 

पाकिस्तान आणि इराणची सीमा जवळपास १००० किमीची आहे. इराणवर जर संकट आलेच तर त्याची झळ पाकिस्तानलाही बसणार आहे. इस्रायल जर आक्रमक झाला तर इराण एकटा काही करू शकत नाही असे पाकिस्तानी मिडीयाने म्हटले आहे. यामुळे पाकिस्तान कोणाच्या बाजुने जाणार हे इराणसाठी महत्वाचे आहे. पाकिस्तानकडे अमेरिकेची लढाऊ विमाने आहेत. यामुळे अमेरिका पाकिस्तानचा वापर करू शकते असा संशय इराणला आहे. 

टॅग्स :IranइराणPakistanपाकिस्तानIsraelइस्रायल