शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

रशियाविरोधात पहिल्यांदाच उचललं भारतानं मोठं पाऊल; अमेरिका खुश, पुतिन काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 23:58 IST

सुरुवातीपासून भारत कोणत्याही एका बाजूचे समर्थन करण्याचे टाळत होता आणि रशियाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत नव्हता, त्यामुळे अमेरिकेसारखे अनेक पाश्चिमात्य देशही भारतावर नाराज होते.

नवी दिल्ली - रशिया यूक्रेन युद्धामुळे जगभरात रशियाच्या विरोधात युरोपियन देशांनी आक्रमक पवित्रा घेत रशियावर अनेक निर्बंध लादले. परंतु भारतानं रशियाविरोधात कुठलेही पाऊल उचललं नाही. मात्र पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनची बाजू घेत भारताने रशियाच्या विरोधात मतदान केले आहे.  रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे, त्यामुळे जगातील अनेक देश दोन गटात विभागले गेले आहेत. 

या युद्धात अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे, तर अनेक देश रशियाच्या पाठीशी उभे आहेत. पण भारताने सुरुवातीपासूनच यावर ठाम भूमिका घेतली नव्हती. हे युद्ध चुकीचे असल्याचं सांगत भारत संवादातून वादावर तोडगा काढण्याची सातत्याने मागणी करत आहे. मतदानावेळी १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठकीला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले. विशेष म्हणजे दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच भारताकडून एकाच बाजूने मतदान होत आहे.

भारताच्या भूमिकेनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्कासुरुवातीपासून भारत कोणत्याही एका बाजूचे समर्थन करण्याचे टाळत होता आणि रशियाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत नव्हता, त्यामुळे अमेरिकेसारखे अनेक पाश्चिमात्य देशही भारतावर नाराज होते. याचवेळी, भारताने रशियाकडून तेल खरेदी-विक्री सुरू केल्यावर पाश्चिमात्य देशांची ही नाराजी अधिकच वाढली होती. अशा स्थितीत भारताने प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळे आता भारताला मैत्रीपूर्ण देश म्हणणाऱ्या रशियाची प्रतिक्रिया काय असेल हे पाहावे लागेल.

भारत घेत नव्हता ठोस भूमिकारशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान भारत सतत मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून शांततेचे आवाहन करत होता. भारताने एकदाही दोन्ही देशांबाबत आपली भूमिका मांडली नाही. याच कारणामुळे भारताने रशियाविरोधात केलेल्या मतदानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारत दोन वर्षांसाठी UNSC चे अस्थायी सदस्य आहे. भारताचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त रशियाबरोबरच्या सहा महिन्यांच्या युद्धाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सुरक्षा परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांनी प्रक्रियात्मक मतदान केले. प्रक्रियात्मक मतदान म्हणजे यूएनएससीच्या स्थायी सदस्याने व्हिटो केला असला तरीही तो ठराव स्वीकारणे. असे मतदान काही बाबतीतच केले जाते.

भारताने रशियाकडून तेल घेणे अमेरिकेला पसंत नाहीयुक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असताना भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा करार केला होता. तेव्हापासून रशिया भारताला तेल देत आहे. विशेष बाब म्हणजे तेल खरेदीच्या बाबतीत रशिया हा भारताला सर्वाधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा दुसरा देश ठरला आहे. मात्र तरीही भारताला तेल पुरवण्यात इराक पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे अमेरिकेला आवडले नाही आणि अमेरिकेने अनेकवेळा भारतावर नाराजी व्यक्त केली होती. तथापि, भारताने तेल खरेदीच्या बाबतीत कोणत्याही दबावाखाली येणार नाही आणि देशातील जनतेच्या हिताच्या करारावर पुढे जाईल, असे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, भारत आणि रशिया यांच्यातील तेल करारावर युक्रेनही खूश नाही.

टॅग्स :IndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिका