शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

युद्धासाठी सज्ज रहा - शी जिनपिंग यांचे चिनी लष्कराला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 16:20 IST

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गुरुवारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नव्या नेतृत्वाबरोबर पहिली बैठक झाली.

ठळक मुद्दे2050 पर्यंत जगातील शक्तीशाली, सर्वोत्तम लष्कर उभे करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. भविष्यात चीन समोर अमेरिकेच्याबरोबरीने भारताचेही आव्हान असेल.

बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गुरुवारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नव्या नेतृत्वाबरोबर पहिली बैठक झाली. चिनी लष्कराला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हटले जाते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने 19 व्या काँग्रेस परिषदेत केंद्रीय लष्करी आयोगावर नव्या सदस्यांची निवड केली आहे. या सदस्यांबरोबर शी जिनपिंग यांनी चर्चा केली. यावेळी जिनपिंग यांनी  पीपल्स लिबरेशन आर्मीला युद्ध जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला तसेच युद्धासाठी सज्ज राहण्यासही सांगितले. 

युद्ध कसे जिंकता येईल त्यावर लक्ष द्या तसेच लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर (मॉर्डनायझेशन) भर देण्यास सांगितले. 2050 पर्यंत जगातील शक्तीशाली, सर्वोत्तम लष्कर उभे करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या बैठकीच्यावेळी शी जिनपिंग लष्करी गणवेशात होते. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना पक्षासोबत पूर्णपणे एकनिष्ठ रहाण्याचा आदेश दिला. 2035 पर्यंत चिनी लष्कराची मॉर्डनायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. 

भविष्यात चीन समोर अमेरिकेच्याबरोबरीने भारताचेही आव्हान असेल. दोन महिन्यांपूर्वी डोकलामच्या मुद्यावरुन चीन आणि भारताचे लष्कर समोरासमोर उभे होते. यावेळी चीनकडून दादागिरीचा भरपूर प्रयत्न झाला. सरकारी मालकीच्या वृत्तपत्रातून भारताला भरपूर धमक्या देण्यात आल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भारचाने ना युद्धाची भाषा केली, ना आपले सैन्य मागे घेतले. भारताच्या या खंबीर भूमिकेमुळे अखेर चीनला माघार घ्यावी लागली. भारताबरोबर आपल्याला युद्ध परवडू शकत नाही हे चीनच्या कळून चुकले आहे तसेच दक्षिण चीन समुद्रातही चीनसमोर अनेक देशांचे आव्हान आहे. त्यामुळे चीनने आपल्या लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर जोर दिला आहे. 

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मागच्या आठवडयात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक काँग्रेसमध्ये साडेतीन तासांचे भाषण केले. यावेळी त्यांनी सन २०१२ मध्ये पक्ष व सरकारची धुरा स्वीकारल्यापासून केलेल्या कामाचा अहवाल सादर करतानाच शी जिनपिंग यांनी २०५० पर्यंत चीनला महान समाजवादी राष्ट्र बनविण्याचा संकल्पही जाहीर केला.बीजिंगमधील हे अधिवेशन जागतिक प्रसारमाध्यमांना खुले नव्हते. एकपक्षीय सत्ता असलेल्या चीनमध्ये पक्ष व सरकारप्रमुख म्हणून एकाच व्यक्तीकडे ठेवण्याची परंपरा आहे. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलाम