शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

Flashback 2020 : कुणी फिटनेस दाखवत तर कुणी खावून रचला इतिहास; हे आहेत 2020मधील खास गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 24, 2020 16:20 IST

कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण जगालाच कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र, याकाळात अनेकांनी नव-नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील प्रस्थापित केले आहेत. एक नजर अशाच काही खास रेकॉर्ड्सवर...

जसजसे नवीन वर्ष 2021 जवळ येत आहे. तसतसे अनेक जन 2020 या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण जगालाच कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र, याकाळात अनेकांनी नव-नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील प्रस्थापित केले आहेत. यात स्टेक घालून 30 सेकंदात सर्वाधिक स्किपिंग करण्यापासून ते तीन मिनिटांत सर्वाधिक जाम डोनट्स खान्यापर्यंतच्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे. एक नजर अशाच काही खास रेकॉर्ड्सवर...

1. जगातील सर्वात लांब केस असलेली मुलगी -निलांशी पटेल ही जगातील सर्वात लांब केस असलेली किशोरवयीन मुलगी ठरली आहे. तिच्या केसांची लांबी दोन मिटर, म्हणजेच 6 फूट 6.7 इंच एवढी आहे. निलांशी पटेलने स्वतःच स्वत:चा विक्रम (रेकॉर्ड) मोडण्याची ही तिसरी वेळ आहे.

2. रोलर / इनलाईन स्केट्स घालून 30 सेकंदात सर्वाधिक स्किप्स - हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जोरावर सिंग यांनी नोंदवला आहे त्यांनी रोलर / इनलाईन स्केट्स घालून 30 सेकंदांत 147 स्किप्स केले. जोरावर पूर्वी हायस्कूलमध्ये एक डिस्कस थ्रोअर होते. मात्र गंभीर दुखापतीनंतर त्यांनी या स्पोर्ट प्रकाराला राम राम केला आणि नंतर आपला फिटनेस चांगला करण्यासाठी त्यांनी स्किपिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी जंप रोप वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये भाग घेतला होता आणि नंतर त्यांनी या क्षेत्रातील बेस्ट होण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किताब मिळविण्याचे ठरवले होते.  

3. एका मिनिटात सर्वाधिक क्ले टार्गेट पंचेस - एका मिनिटात सर्वाधिक क्ले टार्गेट पंचेसचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मुहम्मद रशीदच्या नावावर आहे. त्याने एका मिनिटात 62 पंच मारले. रशीदच्या नावावर अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. यात हाताने एका मिनिटात सर्वाधिक आक्रोड तोडण्याचा रेकॉर्डदेखील आहे.

4. जगातील सर्वाधिक उंची असलेला किशोरवयीन मुलगा - हा रेकॉर्ड 14 वर्षीय रेन केयु (Ren Keyu)च्या नावावर आहे. त्याची उंची 221.03 cm किंवा 7 फूट 3.02 इंच एवढी आहे. बालकमंदिरात असताना त्याची उंची तब्बल 150 सेंटीमिटर होती.

5. तीन मिनिटांत सर्वाधिक जाम डोनट्स खाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड - हा विक्रम लेआ शटकेव्हर (Leah Shutkever)च्या नावे आहे. ती मुळची युकेतील बर्मिंघमची आहे. तीने केवळ तीन मिनिटांत 10 जॅम डोनट खान्याचा गिनीज वर्ल्ड रोकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शटकेव्हरने या चॅलेन्जदरम्यान ओठ एकदाही न चाटता हे सर्व डोनट्स खालले होते.

 

टॅग्स :flashback 2020फ्लॅशबॅक २०२०guinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डFitness Tipsफिटनेस टिप्स