शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

पाच हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिममानवाच्या खुनाचा छडा!

By admin | Updated: March 29, 2017 01:42 IST

इटलीच्या उत्तरेस आॅस्ट्रियाला लागून असलेल्या ओत्झाल प्रांतातील आल्प्स पर्वतात पाच हजार वर्षांपूर्वीच्या ज्या हिममानवाचे

बोल्झानो (इटली) : इटलीच्या उत्तरेस आॅस्ट्रियाला लागून असलेल्या ओत्झाल प्रांतातील आल्प्स पर्वतात पाच हजार वर्षांपूर्वीच्या ज्या हिममानवाचे प्रेत सापडले होते त्याचा कदाचित खाद्यपदार्थ गोळा करण्यावरून झालेल्या मारामारीत प्रतिस्पर्ध्याने पाठीमागून बाण मारून खून केला होता, असा निष्कर्ष अत्याधुनिक फॉरेन्सिक तंत्रांचा वापर करून तपासकर्त्यांनी काढला आहे.सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व ३,३०० च्या आसपास ताम्रयुगात होऊन गेलेल्या या पुरुष हिममानवाचे प्रेत सन १९९१ मध्ये आल्प्स पर्वतांत गिर्यारोहण करणाऱ्या हायकर्सना सापडले होते. इतकी वर्षे एका गोठलेल्या हिमनदीत न सडता जसेच्या तसे टिकून राहिलेले हे प्रेत जागतिक तापमानवाढीने बर्फ वितळल्यामुळे दृष्टोत्पत्तीस पडले होते. ओत्झाल प्रांतात सापडले म्हणून या हिममानवास ‘ओत्झी’ असे टोपणनाव दिले गेले.तेव्हापासून हे प्रेत गेली २५ वर्षे बोल्झानो येथील दक्षिण टायरॉल पुरातत्वीय वस्तुसंग्रहालयात ‘मम्मी’च्या स्वरूपात अक्षरश: गोठवून जतन करून ठेवण्यात आले आहे. जगातील सर्वोत्तम जतन करून ठेवलेली ‘मम्मी’ म्हणून ती ओळखली जाते. (वृत्तसंस्था)पोटातील अन्नांशांचे विश्लेषणगोठलेल्या हिमनदीत या हिममानवाचे प्रेत एवढे अप्रतिम जतन झाले  की त्याच्या शरीरातील अंतर्गत अवयवही पाच हजार वर्षे जसेच्या तसे  शाबूत राहिले. यामुळेच त्याच्या पोटातील अन्नाशांचे रासायनिक विश्लेषण शक्य झाले. त्यावरून त्याच्या मृत्यू झाला, तो हिवाळ््याचा अखेरचा किंवा उन्हाळ््याचा सुरुवातीचा काळ होता आणि शेवटच्या जेवणानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला होता, असे वाटते.10 वर्षांपूर्वी या ‘मम्मी’ची क्ष-किरण तपासणी केली गेली, तेव्हा या प्रेताच्या पाठीत गारगोटीचे टोक लावलेल्या बाणाने झालेली जखम आढळून आली होती. त्यावरून या हिममानवाचा अपमृत्यू झाला असावा, असा कयास केला गेला. पण मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. हत्या नेमकी झाली कशी?वस्तु संग्रहालयाच्या संचालिका अँगेलिका फ्लेकिंगर यांना चैन पडेना. त्यांनी अनेक गूढ खुनांचा छडा लावण्याचा दांडगा अनुभव असलेले जर्मनीतील म्युनिक पोलीस दलाचे निरीक्षक अ‍ॅलेक्झांंडर हॉर्न यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. हॉर्न यांनी फॉरेन्सिक विज्ञानाच्या अनेक अतिप्रगत उपशाखांचा उपयोग करून या हिममानवाचा खून झाला होता, असा निष्कर्ष काढला. एवढेच नव्हे तर त्या दिवशी नेमके काय घडलेले असू शकते, याचा एक संभाव्य स्थितीआलेखही त्यांनी तयार केला आहे. हॉर्न यांनी केलेल्या तपासात त्यांना या हिममानवाच्या पाठीवर आधी आढळलेल्या बाण घुसल्याच्या जखमेखेरीज उजव्या हातावर अंगठा आणि तर्जनी यांच्या मध्ये एक खोल, हाडापर्यंत गेलेली खोल जखमही दिसली. ही जखम मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी झाली असावी, असा त्यांनी अंदाज बांधला....आणि बाण थेट छातीत घुसलासर्व दुव्यांचा संगतवार अर्थ लावून हॉर्न यांनी जो आडाखा बांधला, तो थोडक्यात असा : त्या दिवशी हा हिममानव डोंगरावरून सुमारे ६,५०० फूट खाली उतरून दरीत आला. तेथे त्याने खाद्यपदार्थ गोळा केले. ते करीत असताना त्याची प्रतिस्पर्ध्याशी हाणामारी झाली. त्यात जो विजयी ठरला. अन्न घेऊन तो पुन्हा १०,५५० फूट डोंगर चढून त्याच्या आश्रयाच्या ठिकाणी आला. तेथे त्याने विस्तव पेटवून आणलेले अन्न भाजले व त्याचे सेवन केले. तो निवांतपणे आराम करत बसलेला असताना कोणीतरी (कदाचित आदल्या दिवशी ज्याच्याशी हाणामारी झाली तो) पाठीमागून येऊन त्याच्यावर १०० फूट अंतरावरून बाण मारला. तो बाण त्याच्या काखेखालच्या बरगडीतून छातीत घुसला व त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.