एका आजारी तरुणाला वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणारे मेक्सिकन नौदलाचे विमान सोमवारी दुपारी गॅल्व्हेस्टनजवळ टेक्सास किनाऱ्यावर अचानक कोसळले. या भीषण अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित वाचलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.
सात जण होते विमानात
अपघातग्रस्त विमानात एकूण सात जण प्रवास करत होते. यामध्ये चार नौदलाचे अधिकारी आणि चार नागरिक, त्यात एका लहान मुलाचाही समावेश होता. मेक्सिकन नौदलाने जारी केलेल्या निवेदनात मृतांची नेमकी संख्या निश्चित करणे अद्याप कठीण असल्याचे म्हटले आहे.अमेरिकन तटरक्षक दलाने या अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. टेक्सास किनाऱ्यावरील पाण्यात बचाव पथक वाचलेल्यांचा शोध घेत आहे.
वैद्यकीय मोहिमेवर होते विमान
मेक्सिकन नौदलाच्या निवेदनानुसार, हे विमान वैद्यकीय मोहिमेवर होते. एका आजारी तरुणाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी हे विमान रवाना झाले होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले.
गॅल्व्हेस्टनमधील शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, "अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. अधिक माहिती उपलब्ध होताच ती जाहीर केली जाईल."
खराब हवामानाचा संशय
गॅल्व्हेस्टन हे बेट त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या भागात दाट धुके पसरले आहे. खराब हवामानामुळे विमान अपघात झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघाताचे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. मेक्सिकन नौदल या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत असून, पोलिसही तपास हाती घेत आहेत.
Web Summary : A Mexican Navy plane crashed near Galveston, Texas, killing five. The plane was on a medical mission carrying seven, including naval officers, civilians, and a child. Search for survivors continues amidst investigation into the cause, potentially linked to bad weather.
Web Summary : गैलवेस्टन, टेक्सास के पास मैक्सिकन नौसेना का एक विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें पाँच लोगों की मौत हो गई। विमान एक चिकित्सा मिशन पर था जिसमें नौसेना के अधिकारियों, नागरिकों और एक बच्चे सहित सात लोग सवार थे। खराब मौसम के कारण दुर्घटना की आशंका है, जांच जारी है।