शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोरिडामधील शाळेत माजी विद्यार्थ्याकडून गोळीबार, 17 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 08:54 IST

अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांत असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांत असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.मिळालेल्या माहितीनुसार,  फ्लोरिडामधील पार्कलॅन्ड येथील स्टोनमॅन डगलस शाळेत बुधवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबार करणा-या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून शाळेचा परिसर लॉकडाऊन केला आहे. निकोलस क्रुज असे या हल्लेखोराचे नाव आहे. निकोलस हा या शाळेचा माजी विद्यार्थी असून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. 

येथील स्थानिक अधिका-यांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, निकोलस शाळेत घुसल्यानंतर त्याने फायर अलॉर्म वाजवला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी शाळेतील विद्यार्थी वर्गांमध्येच लपून बसले होते. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शाळेच्या इमारतीला घेरले आणि शाळेतील विद्यार्थ्यांची सुटका केली. याचबरोबर, या गोळीबाराची घटना घडल्यानंतर एक तासाहून अधिक वेळानंतर निकोलसला पोलिसांनी अटक केल्याची माहिती येथील ब्रोवार्ड काऊंटीच्या शेरिफ कार्यालयाने माहिती दिली. तसेच, या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा शेरिफ कार्यालयाने दिली आहे. तर, जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडामधील शाळेतील झालेल्या गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे. तसेच, या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून पीडितांना मदत करण्याचे काम सुरु असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते लिंडसे वाल्टर्स यांनी सांगितले. याचबरोबर,  फ्लोरिडाचे गव्हर्नर रिक स्कॉक यांनी सुद्धा या दुर्घटनेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध करत पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

 

 

 

टॅग्स :FiringगोळीबारAmericaअमेरिका