शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

आधी शुल्क लादले, मग माघार घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांना कशाची चिंता? अब्जो डॉलर्सचा खेळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:23 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादण्याचा इशारा दिला होता, परंतु आता माघार घेतली आहे.

Donald Trump Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर शुल्क लादण्याचा इशारा दिला होता. परंतु, आता ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली असून, कॅनडा आणि मेक्सिकोला एका महिन्यासाठी शुल्कातून सूट दिली असून, या दोन्ही देशांसोबतचा प्रश्न वाटाघाटीद्वारे सोडवला जाणार आहे. तर, दुसरीकडे त्यांनी चीनवर 10 टक्के शुल्क लादले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आपल्या एकूण व्यवसायापैकी 40 टक्के व्यवसाय कॅनडा, मेक्सिको आणि चीनसोबत करते. अशा स्थितीत ट्रम्प यांचे शुल्क लादण्यामागचे राजकारण समजण्यापलीकडचे नाही. 

निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले, पण...निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादण्याचा इशारा दिला होता, परंतु जिंकल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन लागू करणे कठीण आहे. या कारणास्तव ट्रम्प यांनी चीनवर शुल्क लावले, पण कॅनडा आणि मेक्सिकोला यातून वगळले.

कॅनडा-मेक्सिकोला दिलासा देण्यामागे कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या माघारीचे मुख्य कारण म्हणजे, अमेरिका-कॅनडा आणि अमेरिका-मेक्सिको यांच्यातील कोट्यवधी डॉलर्सचा व्यापार. अल जझीराच्या अहवालानुसार, जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये 776 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. ज्यामध्ये अमेरिकेने मेक्सिकोला $309 अब्ज किमतीचा माल निर्यात केला अन् $476 अब्ज किमतीचा माल आयात केला.

दुसरीकडे, जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान अमेरिका आणि कॅनडामध्ये $700 अब्जचा व्यापार झाला आहे. यापैकी अमेरिकेने कॅनडाला $322 अब्ज किमतीचा माल निर्यात केला आहे आणि अमेरिकेने $377 अब्ज किमतीचा माल कॅनडातून आयात केला आहे. अमेरिकेने कॅनडातून पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू, वीज, युरेनियम, कार, यंत्रसामग्री, धातू, सोने, धान्य आणि बियाणे आयात केली आहेत.

यामुळे माघार...अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क लादले, तर कॅनडा आणि मेक्सिकोदेखील त्यांच्यावर शुल्क लादून बदला घेऊ शकतात. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले होते की, डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्यावर शुल्क लादले, तर आम्ही अमेरिकेवर 25 टक्के शुल्क लादू. याशिवाय, मेक्सिकोनेही अमेरिकेवर 25 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामुळेच ट्रम्प यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन