शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पाकिस्तानात तृतीयपंथीयांसाठी पहिली शाळा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 4:30 PM

योग्य ज्ञानाच्या अभावी आधीच मागे पडलेले हे लोक समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात.

लाहोर- तृतीयपंथी म्हटलं की उपेक्षा हे जणू समिकरणच. शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला येत नाहीत. शिक्षण आणि योग्य ज्ञानाच्या अभावी आधीच मागे पडलेले हे लोक समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. मात्र पाकिस्तानातील नव्या प्रयोगाने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल उचलले आहे.पाकिस्तानामध्ये तृतीयपंथीयासांठी पहिली शाळा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशनचा हा पहिलाच प्रकल्प आहे. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशन (इएफएफ)चे कार्यकारी संचालक मोईज्जाह तारिक यांनी या उद्घाटनानंतर बोलताना सांगितले, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्याआधारीत प्रशिक्षणही या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी फॅशन डिझायनिंग, सौंदर्यशास्त्र, एम्ब्रॉयडरी, शिवणकाम, पाकशास्त्र, ग्राफिक डिझायनिंग अशा विविध विषयांमध्ये रुची असल्याचे सांगितले होते, त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.अशी मिळाली प्रेरणा...या शाळेचे मालक असिफ शहजाद म्हणाले, या शाळेत तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 2016 साली इंडोनेशियात तृतीयपंथीयांच्या शाळेला बॉम्बने उडवून देण्यात आले. त्यामुळे मला अतिशय वाईट वाटले. मुस्लीम देशांमध्ये तृतीयपंथीयांसाठी असणारी ती एकमेव शाळा होती. त्यानंतर आम्ही तृतीयपंथीयांना शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला.या शैक्षणिक संस्थेमधून मुलांना डिप्लोमाचे शिक्षण घेता येणार आहे. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना नोकरी मिळवणे शक्य होणार आहे किंवा त्यांना व्यवसाय करायचा असेल तर एनजीओची मदत मिळणार आहे. तसेच या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही अट नसेल. पाकिस्तानमध्ये 2017 सालच्या आकडेवारीनुसार 10,418 तृतीयपंथी आहेत असे पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने स्पष्ट केले होते. त्यापैकी पंजाब प्रांतामध्ये 64.4 टक्के म्हणजे 6,709 तृतीयपंथी असल्याचे त्यात नमूद केले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरल