शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आधी कतार आता अबुधाबी; आखातात युद्धाचा भडका! इराणचा युएईच्या गॅस प्लांटवर मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 08:38 IST

मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता तेल आणि गॅसच्या विहिरींपर्यंत पोहोचली असून संपूर्ण जग ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता तेल आणि गॅसच्या विहिरींपर्यंत पोहोचली असून संपूर्ण जग ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. इराणने गुरुवारी पहाटे संयुक्त अरब अमिरातीच्या 'हबशान' गॅस फॅसिलिटी आणि 'बाब' फिल्डवर भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे युएई कमालीचे संतापले असून, त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव अबुधाबीतील गॅस ऑपरेशन्स तातडीने बंद करण्यात आली आहेत.

इंधनाचे दर भडकले; खिशाला बसणार झळ

या युद्धाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत एकाच दिवसात ५ टक्क्यांनी वाढ होऊन दर १०८ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून ब्रेंट क्रूडच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा फटका केवळ गॅसोलीनलाच नाही, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक वस्तूच्या किमतीला बसणार आहे.

इराणच्या गुप्तचर मंत्र्याचा खात्मा

इस्रायलने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी इस्रायलने इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी आणि रिव्होल्यूशनरी गार्डचे जनरल गुलाम रेजा सुलेमानी यांचाही खात्मा केला होता. या मोठ्या हत्येनंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी "अजून मोठे सरप्राईज येणे बाकी आहे," असा इशारा देत इराणची झोप उडवली आहे.

पलटवार आणि 'हॉर्मुझ'चा वेढा

आपल्या नेत्यांच्या हत्येने खवळलेल्या इराणने सौदी अरब, कुवेत, बहरीन आणि युएईमधील एनर्जी प्लांटवर मिसाईल्सचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे, इराणने इस्रायलवर 'मल्टिपल वॉरहेड' असलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, जी इस्रायलची अभेद्य मानली जाणारी संरक्षण यंत्रणा भेदण्यास सक्षम आहेत. दरम्यान, जगातील २० टक्के तेल वाहतूक होणारा 'हॉर्मुझ स्ट्रेट' हा समुद्री मार्ग इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांसाठी बंद केल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मानवी हानी आणि विस्थापितांचे संकट

या महाभयंकर युद्धात आतापर्यंत इराणमध्ये १,३०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर लेबनॉनमधील परिस्थिती अधिक भीषण असून, तेथील २० टक्के लोकसंख्या म्हणजेच सुमारे १० लाख लोक बेघर झाले आहेत. इस्रायलमध्येही इराणी मिसाईल्समुळे जीवितहानी सुरूच आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोज्तबा खामेनेई हे देखील एका हल्ल्यात जखमी झाल्याची चर्चा असून, त्यांनी या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Attacks UAE Gas Plants, Middle East War Escalates

Web Summary : Iran attacked UAE gas facilities, intensifying Middle East conflict. Oil prices surged. Israel targeted Iranian leaders. Iran retaliated, blockading Hormuz Strait. Casualties rise, creating a global crisis.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्ध