शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात फुलले पहिले फूल!

By admin | Updated: January 18, 2016 03:54 IST

अवकाशात प्रथमच झिनियाचे फूल फुलले आहे. हे फूल केवळ सौंदर्यासाठी फुलविण्यात आलेले नसून त्यामागे वैज्ञानिक उद्देश आहे, असे ‘नासा’ने म्हटले.

वॉशिंग्टन : अवकाशात प्रथमच झिनियाचे फूल फुलले आहे. हे फूल केवळ सौंदर्यासाठी फुलविण्यात आलेले नसून त्यामागे वैज्ञानिक उद्देश आहे, असे ‘नासा’ने म्हटले. मंगळावरील प्रदीर्घकाळच्या मोहिमांच्या आयोजनात या कौशल्याचा उपयोग होईल, असे नासाने सांगितले.आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) छोटेसे हायड्रोपोनिक शेत २०१४च्या वसंत ऋतूत तयार झाले होते. पहिल्या प्रयत्नात झिनियाचे रोप वाळून गेले होते. त्यानंतर अंतराळवीरांनी त्याच्या आहारात बदल केले. त्याआधी या केंद्रावर कोथिंबीर पिकविण्यात आली होती.अंतराळात भाजी पिकविण्याच्या प्रयत्नांतून प्रथमच झिनिया हे फूल यशस्वीरीत्या फुलविले गेले. या प्रयत्नांतून अंतराळात लागवडीसाठी स्वतंत्र अशी जागा तयार करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकेल. झिनियाचा अपक्वतेचा काळ हा खूपच जास्त ८० दिवस असतो व ते फूल बाहेरील परिस्थितीत खूप संवेदनशीलही असते, असे तज्ज्ञांचम्हणणे आहे. या प्रकल्पाचे समन्वयक ट्रेंट स्मिथ म्हणाले की अशा लहरी रोपांची लागवड करण्यातून आयएसएसकडील उपकरणे आणि अंतराळवीर हे अशा लागवडीसाठी किती सज्ज आहेत हे दिसले. याआधी पिकविल्या भाज्यानासाचे अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली यांनी झिनियाची छायाचित्रे पाठविली आहेत. स्वत: केली यांनी टिष्ट्वटरद्वारे ही माहिती दिली. अवकाशात दुसऱ्या स्वरुपाचे जीवन आहे. नारिंगी रंगाचे हे झिनिया फूल दक्षिण पश्चिम अमेरिकेमध्ये अगदीच काही अपरिचित नाही. आयएसएसवर भाज्या पिकविण्याचा प्रयोग वर्षभरापूर्वी सुरू झाला होता व १० आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदा अंतराळवीरांना कोथिंबीर घेण्यात यश आले होते. आयएसएसवर वेगी सिस्टीमने (भाजी पिकविण्याची पद्धत) मे २९१५ मध्ये भाज्यांचे यशस्वी पीक घेण्यात आले होते. दिसत नसलेला प्रकाश आणि निर्वात पोकळीत (वेटलेसनेस) रोपांना वाढण्याला प्रेरणा देण्यासाठी ही सिस्टीम निळे, हिरवे व लाल लेड दिव्यांनी सज्ज आहे.तुमची बाग कशी आहे? येथे अवकाशात माझी बाग फुलली आहे, असे स्कॉट यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी टिष्ट्वटरवर म्हटले. स्कॉट केली हे अमेरिकन अंतराळवीर असून ते अभियंता आणि अमेरिकन नौदलातून कप्तान म्हणून निवृत्त आहेत. अंतराळातील या आधीच्या तीन मोहिमांतही ते सहभागी होते. नंतर त्यांची वर्षभर चालणाऱ्या व मार्च २०१५ मध्ये सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र मोहिमेसाठी नोव्हेंबर २०१२ मध्ये निवड करण्यात आली होती.