शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग झालेल्या जगातील पहिल्या कुत्र्याचा मृत्यू; तीन दिवसांपूर्वीच मिळाला होता डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 14:18 IST

Coronavirus मालकिणीच्या संपर्कात आल्यानं कोरोना झालेल्या कुत्र्याचा मृत्यू

ठळक मुद्देतीन दिवसांपूर्वी कुत्र्याला मिळाला होता डिस्चार्जक्वॉरेंटाईनमधून सोडण्यात आल्यानंतर कुत्र्याचा मृत्यूमालकिणीच्या माध्यमातून झाली होती कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेल्या जगातल्या पहिल्या कुत्र्याचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे क्वॉरेंटाईनमधून घरी सोडण्यात आल्यानंतर या कुत्र्यानं प्राण सोडला. कुत्रा ठणठणीत बरा झाल्याचं डॉक्टरांनी त्याला क्वॉरेंटाईनमधून घरी सोडलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत कुत्रा दगावल्यानं कुत्र्याच्या मालकिणीला धक्का बसला. हाँगकाँमध्ये ही घटना घडलीय. हाँगकाँगमध्ये १७ वर्षीय पॉमेरियन कुत्र्याचा मृत्यू झालाय. कुत्र्याची ६० वर्षीय मालकीण इवॉन चॉ हाऊ ली यांना गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झाली. त्यांच्याकडून कुत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र त्या आठवड्याभरात बऱ्या झाल्या. हाऊ ली यांच्या माध्यमातूनच कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती हाँगकाँगच्या कृषी, मत्स्योत्पादन विभागाच्या प्रवक्त्यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिली. १६ मार्चला कुत्रा मरण पावल्याचं हाऊ ली यांनी सांगितलं. कुत्र्याच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी ऑटोप्सी करणं आवश्यक आहे. मात्र हाऊ ली त्यासाठी परवानगी देत नसल्याचंदेखील प्रवक्त्यानं पुढे सांगितलं.पॉमेरियन कुत्र्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. १२ आणि १३ मार्चला त्याची तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं त्याला घरी सोडण्यात आलं. मात्र त्यानंतर तीनच दिवसांत त्याचा मृत्यू झाला. या कुत्र्याच्या मालकिणीला फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोना झाला होता. त्यानंतर त्या रुग्णालयात दाखल झाल्या. ८ मार्चला त्या ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या. सध्या तरी कुत्रा या एकमेव प्राण्याला कोरोनाची बाधा झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून कोरोना पसरत असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याचंदेखील संघटनेनं म्हटलं होतं. कोरोना झालेल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानं आता जगभरातल्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या