शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मृत पावलेल्या व्यक्तीमधूनही कोरोनाचा फैलाव?; जगातील पहिलीच घटना असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:04 IST

coronavirus मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; संशय वाढला

बँकॉक: कोरोनाग्रस्त व्यक्ती संपर्कात आल्यास वेगानं संसर्ग होतो. मात्र आता कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या माध्यमातूनही कोरोना पसरत असल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. थायलंडमधल्या वैद्यकीय निरीक्षकाच्या मृत्यूनंतर शास्त्रज्ञांनी हा संशय व्यक्त केला. फॉरेन्सिक विभागात काम करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून अशा प्रकारची ही पहिलीच घटना समजली जात आहे.फॉरेन्सिक विभागातल्या कर्मचाऱ्यांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचना संशोधकांनी फॉरेन्सिक अँड लिगल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या पत्रात केली होती. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना पसरतो का, हे अद्याप सिद्ध झालं नसल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा मृतदेह हाताळणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याविषयी फॉरेन्सिक अँड लिगल मेडिसिन जर्नलमध्ये २० मार्चला एक पत्र प्रसिद्ध झालं. त्यावेळी थायलंडमध्ये आढळलेले बहुतांश कोरोना रुग्ण परदेशांतून आलेले होते आणि सामुदायिक संसर्गाची लक्षणं अतिशय कमी होती, असं संशोधकांनी पत्रात नमूद केलं होतं. याशिवाय त्यावेळी कोरोनाची बाधा झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या केवळ दोन इतकी होती. त्यामुळेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं वैद्यकीय निरीक्षकांना संसर्ग होण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचं संशोधकांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या