शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Firing In Bus Video: धावत्या बसमध्ये चालक आणि प्रवाशाचा एकमेकांवर गोळीबार; पाहा धक्कादायक VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 20:58 IST

Firing In Bus Video: हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Firing In Bus Video: धावत्या बसमध्ये गोळीबाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये बस चालक आणि प्रवासी एकमेकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. ही घटना बसमध्ये लागलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली. बसच्या आत घडलेली घटना पाहून कोणालाही धक्का बसेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे धक्कादायक प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाचे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात शार्लोट भागात घडली. प्रवाशाने चालकाच्या सीटजवळ येऊन त्याच्याशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली. बोलतेवेळी त्याने बंदूकही बाहेर काढली. त्याच्या दोन्ही हातात बंदूका होत्या. यादरम्यान चालकाने त्याच्याकडील बंदूकीतून गोळीबार केला.

कशामुळे वाद झाला ?ओमरी टोबियास (22) असे या प्रवाशाचे नाव आहे, तर डेव्हिड फुलार्ड असे चालकाचे नाव आहे. स्टॉपवर उतरण्यावरून ड्रायव्हर डेव्हिड आणि प्रवासी ओमरी यांच्यात वाद सुरू झाला. ओमरी नियोजित थांब्यापूर्वी बस थांबविण्याचा आग्रह धरत होता. डेव्हिडने पुढच्या स्टॉपवर थांबू, असे सांगताच ओमरीने बंदूक बाहेर काढली. हे पाहून डेव्हिडनेही बंदूक बाहेर काढली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला.

या गोळीबारात बसच्या आतील काच चक्काचूर झाली. डेव्हिडच्या गोळीबाराने घाबरलेला ओमरी धावून सीटच्या मागे लपला. शेवटी ओमरी बसमधून उतरून पळून गेला. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत चालकाच्या हाताला आणि प्रवाशाच्या पोटात दुखापत झाली आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारAmericaअमेरिका