शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO-भल्यामोठ्या पाळण्यात बसणं बेतलं जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 15:55 IST

भल्यामोठ्या पाळण्यात बसणं आणि धमाल करणं हा अनुभव नेहमीच सगळे घेत असतात.मोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. थरार आणि मज्जा असा दुहेरी अनुभव मोठमोठ्या पाळण्यात बसल्यावर घेता येतो.

ठळक मुद्देमोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. थरार आणि मज्जा असा दुहेरी अनुभव मोठमोठ्या पाळण्यात बसल्यावर घेता येतो. पण ही धमाल अनेकदा लोकांच्या जीवावर देखील बेतू शकतेओहिओ स्टेट फेअरमध्ये बुधवारी लोक ‘द फायर बॉल अम्युझमेंट राईड’मध्ये बसून थरार अनुभवत होते.

ओहिओ, दि. 28- भल्यामोठ्या पाळण्यात बसणं आणि धमाल करणं हा अनुभव नेहमीच सगळे घेत असतात.मोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. थरार आणि मज्जा असा दुहेरी अनुभव मोठमोठ्या पाळण्यात बसल्यावर घेता येतो. पण ही धमाल अनेकदा लोकांच्या जीवावरही बेतू शकतं. असाच एक वाईट अनुभव आहिओच्या जत्रेत आला.ओहिओ स्टेट फेअरमध्ये बुधवारी लोक ‘द फायर बॉल अम्युझमेंट राईड’मध्ये बसून थरार अनुभवत होते. पण याचवेळी एक दुर्दैवी घटना घडली. हा पाळणा हवेत झोकावत असताना एका खांबाला जोरदार धडकला. यामुळे पाळण्याचा काही भाग थेट 50 फूट खाली कोसळला.. या दुर्घटनेत एकाचा मृत्यूही झाला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झालीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे अगदी स्पष्टपणे व्हिडीओत दिसतं आहे. या दुर्घटनेत एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. 

द फायर बॉल राईड हे पेंडूलमसारखं असून ते एकाबाजूने दुसऱ्या जातं.  या राइडमध्ये पाळणा जमिनीपासून 40 फूट उंच जातो आणि एक मिनिटांत 13 फेऱ्या होतात. या राईडमध्ये चार सीटचे सहा सेक्शन असतात. अनेकांना अशा राईडमध्ये बसून थरार आणि मज्जा अनुभवण्याची आवड असते. पण हा थरार कधी कधी जीवावर बेतू शकतं, हे ओहिओतील दुर्घटनेवरुन समोर आलं आहे.

हा अपघात ओहिओमध्ये घडलेला सगळ्यात वाईट अपघात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आहे. ‘द फायर बॉल अम्युझमेंट राईड'मध्ये 'फायर बॉल राईड' ही सगळ्यांचं आकर्षण ठरतो. तेथे भेट देणारे पर्यटक आवर्जून त्या राइडचा थरार अनुभवण्यासाठी जातात. पण तेथे बुधवारी घडलेल्या घटनेनंतर बऱ्याच पर्यटकांनी त्या राइडमध्ये न जाणं पसंत केल्याची माहिती समोर येते आहे.या अपघातात ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याने नुकतंच फ्रॅन्किन हाइट्स हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं होतं.