शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी करताना फिनलँडच्या पंतप्रधानांचा व्हिडीओ झाला होता व्हायरल, ड्रग्स टेस्ट रिपोर्टनं केलं अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:04 IST

फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादाला तोंड फुटले होते.

फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादाला तोंड फुटले होते. फिनलँडमधील विरोधी नेत्यांनी व्हिडीओवरून पंतप्रधान सना मरिन यांना घेरण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर पंतप्रधानांची ड्रग्स टेस्ट करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. यानंतर सना मरिन यांनी ड्रग्स घेतल्याचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्यांनी पार्टीमध्ये केवळ मद्यप्राशन केल्याचेही सांगितले होते. परंतु वाढता वाद पाहून त्यांनी स्वखर्चाने ड्रग्स टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे.

फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी गेल्या शुक्रवारी ड्रग टेस्ट केली होती. परंतु त्यापूर्वी त्यांनी पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेतले नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतरही वाढता वाद पाहता त्यांनी आपली ड्रग टेस्ट केली होती. फिनलँड सरकारकडून जारी करम्यात आलेल्या निवेदनात पंतप्रधानांच्या केलेल्या चाचणीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी स्वखर्चाने ही चाचणी केले असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

व्हायरल झाला होता व्हिडीओसोशल मीडियावर सना मरीन यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावर निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रियाही आल्या होत्या. जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या त्यांच्या मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओबाबत सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आपला व्हिडीओ तयार केला जात हे मला माहिती होते. मात्र हा व्हिडीओ सार्वजनिक करण्यात आल्याने दु:ख झाल्याचे पंतप्रधान म्हणाल्या होत्या.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानfinlandफिनलंड