शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’वर लस शोधणे हाच आता प्रभावी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 03:05 IST

संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख : वर्षाच्या अखेरपर्यंत शोध लागण्याची आशा

न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ आजाराच्या साथीने जगाचे विस्कळीत झालेले व्यवहार पूर्ववत होण्यासाठी या आजारावर प्रतिबंधक लस शोधणे हाच प्रभावी उपाय दिसतो, असे मत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्तोनिओ ग्युटेर्स यांनी व्यक्त केले. अशी लस कदाचित या वर्षाच्या अखेरपर्यंत शोधली जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या ५० हून अधिक आफ्रिकी देशांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ बैठकीत बोलताना ग्युटेर्स म्हणाले की, या साथीवर सुरक्षित व परिणामकारक लस शोधली गेली, तरच लाखो प्राण आणि अब्जावधी डॉलरचे नुकसान वाचवून जगाचा गाडा पूर्वपदावर येऊ शकेल असे दिसते.अशी लस शोधली गेली आणि ती जगातील सर्व देशांना लवकरात लवकर उपलब्ध झाली, तरच या साथीचा पूर्ण प्रतिबंध होऊ शकेल. यासाठी सर्व देशांनी पूर्ण सहकार्य व समन्वयाने वागायला हवे, असेही ग्युटेर्स यांनी नमूद केले.या साथीचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांनी दोन अब्ज डॉलरचा निधी देणग्या देऊन उभारावा, असे आवाहन ग्युटेर्स यांनी २५ मार्च रोजी केले होते. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत त्यापैकी २० टक्के रक्कम जमा झाली आहे. ’’ (वृत्तसंस्था)संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने नायजेरियातील लागोस राज्यात आयोजित आरोग्य शिबिरामध्ये तेथील नागरिकांना शिकताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघ अनेक देशांना विविध प्रकारची मदत पुरवित आहे. या अंतर्गत आफ्रिकेतील ४७ देशांना कोरोना चाचणीचे साहित्य पुरविले आहे.-अ‍ॅन्तोनिओ ग्युटेर्ससरचिटणीस, संयुक्त राष्ट्रसंघ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ