शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डोनल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केल्या केनेडी हत्याप्रकरणातील फाईल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 12:22 IST

अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन.एफ. केनेडी यांच्या हत्या प्रकरणातील सुमारे 2800 फाईल्स अमेरिकन सरकारने आज प्रसिद्ध केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ही अंमलबजावणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेनेडी यांचे पूर्ण नाव जॉन फिटझगेराल्ड केनेडी असे होते. त्यांचा जन्म 29 मे 1917 रोजी मॅसॅच्युसेटसमधील ब्रुकलिन येथे झाला. 1961 साली ड्वाईट आयसेनहॉवर यांच्यानंतर ते अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष झाले.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन.एफ. केनेडी यांच्या हत्या प्रकरणातील सुमारे 2800 फाईल्स अमेरिकन सरकारने आज प्रसिद्ध केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ही अंमलबजावणी करण्यात आली आहे. अर्थात एफबीआय आणि सीआयएने सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतल्यानंतर इतर फाईल्स जाहीर करणे थांबवण्यात आले.22 नोव्हेंबर 1963 रोजी टेक्सस राज्यातील डल्लास येथे केनेडी यांची हत्या करण्यात आली होती. गेल्या सहा दशकांमध्ये केनेडी यांच्या हत्येमध्ये नेमका कोणाचा सहभाग असेल याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे अमेरिकन जनमानसात याबाबत नेहमीच तर्कवितर्क उपस्थित केले जात होते. मात्र या फाईल्स उघड केल्यानंतरही फारसे काही मिळण्याची शक्यता नाही असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

जेएफके फाईल्स उद्या प्रसिद्ध करणार आहोत अशी माहिती ट्रम्प यांनी आदल्यादिवशीच दिली होती.

केनेडी यांचे पूर्ण नाव जॉन फिटझगेराल्ड केनेडी असे होते. त्यांचा जन्म 29 मे 1917 रोजी मॅसॅच्युसेटसमधील ब्रुकलिन येथे झाला. अमेरिकन नौदलात लेफ्टनंट पदावरती असणाऱ्या केनेडी यांनी दुसऱ्या महायुद्धासह अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. केनेडी हे 1947 ते 1953 याकाळात मॅसॅच्युसेटसमधून संसदेच्या कनिष्ठ सभागृहात तर 1953 ते 1960 या काळात वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून कार्यरत होते. 1961 साली ड्वाईट आयसेनहॉवर यांच्यानंतर ते अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या हत्येनंतर उपराष्ट्राध्यक्ष असणारे लिंडन जॉन्सन राष्ट्राध्यक्ष झाले.केनेडी यांच्या हत्येनंतर अनेक सरकारांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. पण सर्व चौकशी तपास आयोगांनी केनेडी यांची हत्या ली हार्वे ऑस्वल्डने टेक्सस स्कूल बुक डिपॉझिटरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन तीन गोळ्या झाडून केली असा निष्कर्ष मांडला होता. मात्र याशिवाय या हत्येमध्ये आणखी कोणत्यातरी व्यक्तीचा किंवा यंत्रणेचा, कटाचा सहभाग असावा असे अमेरिकन लोकांना वाटते. ऑस्वल्ड हा स्वयंघोषित मार्क्सवादी होता. त्याने रशियामध्ये 1959 ते 1962 या कालावधीत मुक्काम केला होता. तसेच तेथे त्याने रेडिओ आणि टिव्ही कंपनीमध्ये काम केले होते. केनेडी हत्येचा तपास करणाऱ्या वॉरन कमिशनने ऑस्वल्ड केनेडी हत्येआधी काहीदिवस मेक्सिकोसिटी मधील क्युबन व रशियन दुतावासाच्या संपर्कात होता असे निरीक्षण मांडले आहे. काही लोकांच्या मते केनेडी यांची हत्या करताना तेथे दुसरी व्यक्तीही उपस्थित असावी. तसेच त्यांचा वेध घेणारी गोळी त्यांच्या पाठीमागून नव्हे तर समोरुन आली असावी असेही अनेकांचे मत आहे. या हत्येसंदर्भात 1979 साली नेमलेल्या हाऊस सिलेक्ट कमिटीने या हत्येत दोन शूटर्सचा समावेश असावा अशी शक्यता असल्याचे निरीक्षण मांडले होते.