शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे सेक्स हार्मोन्स ठरू शकतात दम्याला कारणीभूत- निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 03:13 IST

महिलांमध्ये असलेले सेक्स हार्मोन्स हे अलर्जी आणि दम्यासारख्या समस्यांना आमंत्रण देत असल्याचा दावा इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

लंडन- महिलांमध्ये असलेले सेक्स हार्मोन्स हे अॅलर्जी आणि दम्यासारख्या समस्यांना आमंत्रण देत असल्याचा दावा इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी पाच लाखांहून अधिक महिलांचं सर्वेक्षण केलं. सखोल विश्लेषण केल्यानंतर महिलांच्या जीवनात होणा-या महत्त्वपूर्ण बदलांमुळे अलर्जी आणि दम्याची लक्षणं निर्माण होतात, असं संशोधन वैज्ञानिकांनी केलं आहे. त्याप्रमाणेच किशोरवय प्राप्त होण्याबरोबरच मासिक पाळी बंद होण्यासारख्या घटना या एकमेकांशी निगडीत असतात, असंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे.इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गच्या निकोला मॅकक्लियरी यांच्या मते, तारुण्य प्राप्त झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात व्यत्यय आल्यास दमा आणि अॅलर्जी सारख्या लक्षणांना निमंत्रण मिळतं. परंतु या मागची कारणं अद्यापही अस्पष्टच आहेत. वैज्ञानिकांनी दम्यानं पीडित असलेल्या महिलांचं तारुण्यापासून वय वर्ष 75 पर्यंतच्या पाच लाखांहून अधिक महिलांवर संशोधन केलं आहे.जर्नल ऑफ एलर्जी अँड क्लिनिकल इम्युनॉलजी यांनी हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी हार्मोन्समधील वाढत्या बदलांमुळे अॅलर्जी आणि दम्याची लक्षणं निर्माण होत असल्याचं निष्पन्न केलं आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय