शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बाप से बेटा सवाई, पण इथे लेक भारी! किम जोंग उन यांच्या वारसदाराची गोष्ट; १३ व्या वर्षीच हाती येणार सत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:00 IST

हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपली १३ वर्षांची मुलगी किम जू ए हिला आपला वारसदार म्हणून घोषित करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

जगासाठी गूढ आणि दहशतीचा केंद्रबिंदू असलेल्या उत्तर कोरियामध्ये आता सत्तेच्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपली १३ वर्षांची मुलगी किम जू ए हिला आपला वारसदार म्हणून घोषित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, ज्या देशात महिलांच्या अधिकारांवर अनेक निर्बंध आहेत, तिथे किम जोंग उन आपल्या मुलाला डावलून मुलीला का प्राधान्य देत आहेत, याच्या चर्चेने जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे.

शाळेची पायरीही चढली नाही, पण ट्रेनिंग कडक!

उत्तर कोरियाच्या 'इन्साइडर' अहवालानुसार, किम जोंग उन यांच्या कुटुंबात पारंपारिक शालेय शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नाही. किम जोंग उन स्वतः देखील फारसे शिकलेले नाहीत, त्यांनी लष्करी महाविद्यालयातून शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी किम जू ए हिला देखील शाळेत पाठवले जात नाही. उत्तर कोरियातील शाळेत मुलींना केस कानाखाली येतील इतके कापण्याचे कडक नियम आहेत, मात्र किम जू ए नेहमी मोठ्या केसांमध्ये आणि स्टायलिश कपड्यांमध्ये दिसते, ज्यावरून ती शाळेत जात नसल्याचे स्पष्ट होते. तिचे प्राथमिक शिक्षण तिच्या आईच्या देखरेखीखालीच झाले आहे.

घोडेस्वारी आणि स्कीइंगचा छंद

किम कुटुंबात घोडेस्वारीला सत्तेचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. किम जोंग उन स्वतः उत्तम घोडेस्वार आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीलाही यात पारंगत केले आहे. किम जू ए हिला घोडेस्वारी आणि स्कीइंगचा प्रचंड छंद आहे. किम जोंग उन तिला प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात, अगदी क्षेपणास्त्र चाचणीच्या ठिकाणीही सोबत घेऊन जातात. यामागे तिला मुत्सद्देगिरी आणि राजशिष्टाचार शिकवण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

मुलाला का नाकारले? समोर आले धक्कादायक कारण

किम जोंग उन यांना तीन अपत्ये असल्याचे बोलले जाते. मग मोठा मुलगा असताना मुलीचीच निवड का? दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर संस्थेच्या दाव्यानुसार, किम यांचा मोठा मुलगा शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आहे आणि त्याला काही अज्ञात व्याधी असल्याचे समजते. त्यामुळे सामर्थ्य दाखवण्याची परंपरा असलेल्या किम कुटुंबाला तो मुलगा वारसदार म्हणून योग्य वाटत नाही. म्हणूनच किम जोंग उन यांनी आपली लाडकी मुलगी किम जू ए हिला जगासमोर आणले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पार्टीच्या जनरल मीटिंगमध्ये किम जोंग उन आपल्या मुलीच्या नावाचा वारसदार म्हणून अधिकृत जाहीरनामा काढण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kim Jong Un's daughter poised to inherit power at 13.

Web Summary : Kim Jong Un is reportedly preparing his 13-year-old daughter as his successor, bypassing his son due to health concerns. Despite North Korea's restrictions on women, Kim Ju Ae is being groomed in horsemanship, diplomacy, and military affairs, signaling a potential shift in leadership.
टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाInternationalआंतरराष्ट्रीय