शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा, पुढच्या आठवड्यात फेसबुकचे 'हे' फीचर बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 11:05 IST

फेसबुकच्या या निर्णयामुळे 1 अब्जांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गने त्यांच्या फेसबुक कंपनीचे नाव मेटा केले आहे. त्यानंतर आता फेसबुकने आपल्या फेसबुक अॅपमध्ये एक मोठा बदल केला आहे. फेसबुकने केलेल्या बदलानुसार, आता यापुढे तुम्ही फोटो अपलोड केल्यावर दुसऱ्याला ऑटो टॅग होणार करणार नाही. गोपनीयतेवरुन फेसबुकवर झालेल्या आरोपांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

या मोठ्या बदलाची अधिकृतरित्या घोषणा फेसबुककडून करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून फेसबुकवर स्वतःच्या फायद्यासाठी युजरच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप लागत आहेत. त्यानंतर आता कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले की, कंपनी आता चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान बंद करेल. तसेच, फेसबुकच्या सर्वरमध्ये असलेल्या एक अब्जाहून अधिक लोकांच्या प्रिंट डिलीट करणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ऑटो टॅग ऑप्शन मिळणार नाही.

काय आहे ऑटो टॅग ?तुम्ही अनेकदा फेसबुकवर स्वतःचा किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत काढलेला फोटो अपलोड केला असेल. तेव्हा फेसबुक त्या फोटोतील तुम्हाला आणि व्यक्तीला तुमच्यासोबत टॅग करत होते. फेसबुक हे सर्व आपल्या फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या मदतीने करत असे. खरं तर, फेसबुक आपल्या वापरकर्त्यांचे चेहरे त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह करुन त्याचा वापर करत असे. हे सर्व फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जायचे. यावरुन फेसबुकवर युजरची माहिती चोरल्याचा आरोप लागला होता. यामुळे कंपनीला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला आहे. पण, आता येत्या आठवडाभरात हे तंत्रज्ञान बंद करण्याची फेसबुकने घोषणा केली आहे.

सर्व्हरवरुन डेटा डिलीट करणारहे तंत्रज्ञान बंद करण्यासोबतच फेसबुक आपल्या सर्व्हरवर असलेला शेकडो कोटी चेहऱ्यांचा डेटा काढून टाकणार आहे. फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बऱ्याच काळापासून वादात होते. या तंत्रज्ञानामुळे फेडरल ट्रेड कमिशनने 2019 मध्ये फेसबुकला $500 मिलियनचा दंड ठोठावला होता. तसेच, फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमुळे गेल्या वर्षी अमेरिकेतील इलिनॉय राज्यात, फेसबुकने त्यांच्याविरुद्धच्या खटल्यात 'फेस जिओमेट्री'सह तक्रारकर्त्यांना बायोमेट्रिक माहितीच्या वापरावर तोडगा काढण्यासाठी $650 दशलक्ष दिले होते.

यामुळे कंपनीचे नावही बदलले

फेसबुकच्या या तंत्रज्ञानाला विरोध करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि बायोमेट्रिक माहिती फेसबुककडे असणे हे होते. मात्र, गेल्या महिन्यात फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने फेसबुकचे अंतर्गत दस्तावेज लीक केले होते, त्यानंतर फेसबुककडून मोठा विरोध झाला होता. कंपनी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप करण्यात आला. ही चूक सुधारण्यासाठी त्याने आपल्या कंपनीचे नावही बदलले होते.

 

टॅग्स :FacebookफेसबुकMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गMetaमेटा