शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर सर्वात मोठी कारवाई; Facebook च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 07:45 IST

Suspended former United States President Donald Trump's FB account for two years: ट्रम्प यांच्या अकाऊंटरवर २ वर्षाची बंदी घातली आहे. ७ जानेवारी २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.

ठळक मुद्देफेसबुकच्या इतिहासात इतकी मोठी कारवाई होण्याची ही पहिली वेळ आहे. अमेरिकेच्या संसद परिसरात ट्रम्प समर्थकांनी जेव्हा हल्ला झाला तेव्हा ट्रम्प यांनी केली होती कौतुकाची पोस्टआमच्या सेवेचा वापर सुरू ठेवण्याची परवानगी देणं सर्वात मोठा धोका आहे - मार्क जुकरबर्ग

अमेरिकेच्या संसदेत दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली फेसबुकनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Former US President Donald Trump) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. फेसबुक(Facebook)नं ट्रम्प यांचे अकाऊंट कमीत कमी २०२३ पर्यंत सस्पेंड केले आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी फेसबुकनं US Capitol घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला होता. एखाद्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांचे अकाऊंटवर बंदी आणण्याची ही पहिलीच घटना आहे.

ट्रम्प यांच्या अकाऊंटरवर २ वर्षाची बंदी घातली आहे. ७ जानेवारी २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. जेव्हा फेसबुकनं पहिल्यांदा ही बंदी घातली होती. फेसबुकच्या इतिहासात इतकी मोठी कारवाई होण्याची ही पहिली वेळ आहे. त्यानंतर काही आठवड्यात कंपनीने या निर्णयाला ओवरसाइट बोर्डला ट्रान्सफर केले. कंपनीनचे म्हणणं आहे की, ज्यावेळी संसद परिसरात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रम्प यांनी “We love You, You are very Special” अशी पोस्ट केली होती. या हिंसक घटनेत सहभागी असणाऱ्यांना देशभक्त म्हणणं आणि या दिवसाची इतिहासात नोंद ठेवली जाईल असं म्हणणं फेसबुकच्या नियमांचा भंग करणे होतं.

आमच्या सुविधेचा वापर करून देणं हा सर्वात मोठा धोका

फेसुबकच्या निरीक्षण बोर्डाने मागील महिन्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंट घातलेली बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. कंपनी ट्रम्प यांच्यावर दंड लावण्यास अपयशी ठरली. ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करतेवेळी फेसबुकचे मुख्य मार्क जुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं की, या काळात माजी राष्ट्राध्यक्षांना आमच्या सेवेचा वापर सुरू ठेवण्याची परवानगी देणं सर्वात मोठा धोका आहे असं सांगितले होते.

बोर्डाने ६ महिन्याचा दिला होता कालावधी

कंपनीने हे प्रकरण अलीकडेच निरीक्षण बोर्डाकडे सोपवलं होतं. या बोर्डात वकील, मानवाधिकार कार्यकर्ते आणि अकैडमिक्स यांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर लावण्यात आलेली बंदी हटवावी की कायम ठेवावी याबाबत बोर्डाला निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यावेळी बोर्डाने अनिश्चित काळासाठी अकाऊंट बॅन करणं आणि दंड लावणं योग्य राहणार नाही असं सांगितले. तसेच बोर्डाने फेसबुकच्या मनमानी दंडाविरोधात चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर कंपनीने २ वर्षासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक खाते २ वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पFacebookफेसबुक