शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

सावधान! तुमच्या प्रत्येक हालचालीकडे फेसबुकचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 15:55 IST

तुमच्या सगळ्या 'आवडीनिवडी' फेसबुकला माहिती आहेत.

न्यू यॉर्क- तुम्ही फेसबुक वापरताना तुमच्या आवडीनिवडीसंदर्भातील जाहिराती किंवा माहिती वॉलवर येत असल्याचे तुम्ही पाहिले असेलच. नेमक्या आपल्या आवडीनुसार सगळ्या गोष्टी कशा वॉलवर येतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?हे सगळं होत असतं फेसबुक तुमच्यावर लक्ष ठेवून राहिल्यामुळं. फेसबुकवर असणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीकडे आपले लक्ष असते, त्याची नोंद ठेवली जाते अशी कबुलीच फेसबुकने दिली आहे.

फेसबुक लोकांच्या आयुष्यातील माहितीचा साठा परवानगीविना गोळा करत असल्याबद्दल आधीपासूनच गदारोळ माजलेला आहे मात्र त्यातच आता आपल्या प्रत्येक क्लीकवर या कंपनीचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण होतं हे निश्चित आहे. फेसबुकने आपण लोकांच्या ऑपरेटिंग सिस्टीम, हार्डवेअ, सॉफ्टवेअर, फोनच्या बॅटरीची पातळी, सिग्नल स्ट्रेंग्थ, त्यांच्याकडे माहिती साठवण्याची असलेली जागा, ब्लूटूथ सिग्नल, फाइल्सची नावे, त्यांचे प्रकार, ब्राउजर या सगळ्यांची माहिती ठेवत असल्याची कबुली दिली आहे. फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीचे लिंग, त्यांच्या मित्रयादीतून वगळण्यात आलेले मित्र, फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीने पाहिलेली प्रत्येक जाहिरात याचीही नोंद ही कंपनी ठेवते. फेसबूकने 222 पानांचा कागदपत्रांचा संच अमेरिकन संसदेसमोर ठेवला आहे.  फेसबूक वापरत असलेल्या व्यक्तीने केलेली प्रत्येक क्लीक, त्यांच्यआजूबाजूस असणाऱ्या वस्तूंची नोंद ठेवली जाते. तसेच ऑनलाइन असो वा ऑफलाइन प्रत्येक हालचाल नोंदवण्याची व्यवस्था फेसबुकने केलेली असते, असे या कंपनीने कबूल केले आहे. फेसबुक वापरणारा माणूस आहे की रोबोट हे पाहाण्यासाठी काही नोंदी घ्याव्या लागतात मात्र फेसबूकने इतर अनेक प्रकारची, व्यक्तीच्या खासगी आयुष्यातील माहिती गोळा केल्याने या कंपनीवर टीका होत आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला अमेरिकन खासदारांच्या समितीच्या संतप्त सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती.

टॅग्स :FacebookफेसबुकInternationalआंतरराष्ट्रीयMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग