शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : फेसबुकचे लंडनमधील ऑफिस बंद, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 17:01 IST

coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची 163 प्रकरणे समोर आली आहेत.

ठळक मुद्देसध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची 163 प्रकरणे समोर आली आहेत. भारतातही 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लंडन : फेसबुकनेलंडनमधील तीन ऑफिस सोमवारपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने आपल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. स्कायन्यूजच्या माहितीनुसार, फेसबुकने एका कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या 3000 कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. फेसबुकचा हा कर्मचारी सिंगापूर येथील होता. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा कर्मचारी लंडनमधील ऑफिसमध्ये आला होता. 

फेसबुकने म्हटले आहे की, ऑफिस सुरु करण्याआधी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. यासंदर्भात फेसबुकने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "आमच्या सिंगापूर येथील ऑफिमधील एका कर्मचाऱ्याला कोविड-19 (कोरोना व्हायरस) ची लागण झाल्याचे समजते. हा कर्मचारी  24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान आमच्या लंडनमधील ऑफिसमध्ये आला होता. दरम्यान, स्वच्छतेसाठी सोमवारपर्यंत लंडनस्थित ऑफिसेस बंद करत आहोत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची घरातून काम करत आहेत."    

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची 163 प्रकरणे समोर आली आहेत. फेसबुकने अमेरिकेतील बे एरियामधील आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण, गुरुवारी सॅन फ्रॅससिस्कोमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची दोन प्रकरणे समोर आली होती. तसेच, फेसबुकने आपल्या सिएटल ऑफिस सुद्धा सोमवारपर्यंत बंद केले आहे. येथील एका कॉन्ट्रॅक्टरला कोरोना व्हायरची लागण झाली आहे. याशिवाय, किंग काउंटी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांकडून 31 मार्चपर्यंत घरातून काम करून घेतले पाहिजे. 

दरम्यान, सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतातही 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाFacebookफेसबुकLondonलंडन