शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

या मुस्लिम देशात चेहरा झाकण्यावर बंदी, सरकारने कायदाच काढला; कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:53 IST

या निर्णयाचा देशातील काही लोक विरोध करत आहेत.

अनेक मुस्लिम देशांमध्ये बुर्खा/हिजाब/नकाब बाबत नियम खूप कडक आहेत. अशातच, मुस्लिम बहुल कझाकस्तानमध्ये सरकारने चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. पंतप्रधान कासिम जोमार्ट तोकायेव यांनी याबाबत कायदाच काढला आहे. यानुसार, कझाकस्तानमध्ये कोणीही आपला चेहरा झाकू शकणार नाही. या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. या निर्णयाबाबत कझाकस्तान सरकारचा युक्तिवाद असा आहे की, चेहरा झाकल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बसवलेले फेस रेकगनेशन तंत्रज्ञान काम करत नाही. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

कधीकाळी सोव्हिएत युनियनचा एक भाग असलेल्या कझाकस्तानमध्ये दीर्घकाळापासून ही मागणी होती. कझाकस्तानमध्ये लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असली तरी, देशाची संस्कृती अजूनही सोव्हिएत मूल्यांनी प्रभावित आहे. चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यासाठी मंजूर झालेल्या कायद्यात कोणत्याही एका धर्माचा किंवा त्याच्या पोशाखाचा उल्लेख नाही, परंतु हे स्पष्ट आहे की, चेहरा झाकण्यावर बंदी असेल. 

इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

पंतप्रधान तोकायेव यांनी या कायद्याचे कौतुक केले आहे. ते म्हणतात की, याद्वारे आपण आपली कझाक ओळख मजबूत करू शकू. चेहरा झाकणारे काळे कपडे घालण्यापेक्षा, आपले कझाक शैलीचे कपडे घालणे चांगले होईल. आपण आपली संस्कृती आणि पोशाखांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कझाकस्तान सरकारच्या या निर्णयाकडे प्रगतीशील दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. परंतु देशात एक वर्ग असा आहे, जो याच्या विरोधात आहे. या लोकांना वाटते की, नागरिकांना त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. 

निषेधांनंतरही कझाकस्तान सरकार निर्णयावर ठामदेशातील ठराविक वर्ग या निर्णयाचा विरोध करत आहे, परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. आपण आपली राष्ट्रीय ओळख टिकवून ठेवली पाहिजे, असे सरकारचे म्हणने आहे. पंतप्रधान ताकायेव म्हणतात की, धर्म हा लोकांचा वैयक्तिक विषय आहे, परंतु पोशाख असा असावा की, जो आपली राष्ट्रीय ओळख प्रतिबिंबित करतो. विशेष म्हणजे, कझाकस्तान व्यतिरिक्त, सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्येही हिजाबवर बंदी आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीमInternationalआंतरराष्ट्रीयWomenमहिला