शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या चीनमधील दूतावासाबाहेर स्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 12:56 IST

चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये गुरुवारी सकाळी अमेरिकन दूतावासाबाहेर स्फोट झाला.

बीजिंग - चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये गुरुवारी सकाळी अमेरिकन दूतावासाबाहेर स्फोट झाला. या स्फोटानंतर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. मात्र या स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसेच या स्फोटात जीवित वा वित्तहानीही झालेली नाही.

 चिनी नागरिक अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी दररोज ज्या ठिकाणी येतात तेथेच हा स्फोट झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट अत्यंत कमी तीव्रतेचा होता. तसेच हा स्फोट झाला तिथून भारतीय दूतावास हाकेच्या अंतरावर आहे. मात्र भारतीय दूतावासामधील कुठल्याही व्यक्तीला या स्फोटामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. या स्फोटाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होत असून, त्यात शेकडो लोक स्फोट झालेल्या ठिकाणी पाहत असल्याचे दिसत आहेत. तसेच रस्त्यावरही धूर पसरलेला दिसत आहे. 

चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार  पोलिसांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका महिलेला स्वत:वर गॅसोलीन ओतताना पकडले आहे. ही महिला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.   

टॅग्स :Blastस्फोटchinaचीनUnited Statesअमेरिका