रशियाचे राष्ट्रापती व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान लिमोझिन (Limousine) कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, काही वेळातच आलिशान कार आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या घटनेमुळे पुतिन यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारमध्ये मोठा स्फोट - पुतिन यांच्या या आलिशान कारची किंमत £275,000 (सुमारे ३ कोटी रुपये) एवढी आहे. रशियन सुरक्षा एजन्सी एफएसबीच्या मुख्यालयासमोर हा स्फोट झाला.'द सन'च्या वृत्तानुसार, या स्फोटानंतर पुतिन यांनी, गटारांसह आपल्या सर्व रक्षकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्फोटावेळी गाडीत कोण-कोण उपस्थित होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर स्फोटानंतर जळत्या कारचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही आग इंजिनपासून सुरू झाली आणि, पुढच्या काही क्षणातच संपूरर्म कार आगीच्या विळख्यात सापडली.