शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पगार रोखून 2.76 कोटी लोकांचे शोषण; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:01 IST

२०१६ ते २०२१ या काळात अशा लोकांची संख्या २७ लाखांनी वाढली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, २०२१ मध्ये जगभरातील २.७६ कोटी लोकांना कोणत्याही दिवशी बळजबरीने मजुरी करणे भाग पडले. हे प्रमाण जगातील १००० लोकांमागे ३.५ इतके आहे. २०१६ ते २०२१ या काळात अशा लोकांची संख्या २७ लाखांनी वाढली. तीन वर्षांपूर्वी असा फटका बसलेल्यांपैकी ८५ टक्के लोक खासगी उद्योग, सेवा आणि शेतीमध्ये सक्तीने मजूर म्हणून काम करत होते. सक्तीच्या श्रमातून दरवर्षी २३६ अब्ज डॉलरचा अवैध नफा होतो. २०१४ पासून अशा नफ्यात ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रदेशानुसार सक्तीच्या मजुरीची टक्केवारी

  • आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्र - ५५%
  • युरोप आणि मध्य आशिया - १५%
  • आफ्रिका - १४%
  • अमेरिका - १३ टक्के
  • अरब देश - ०३%

सक्तीचे काम कुठे?

  • सेवा क्षेत्र - ३२%
  • उद्योग - ३७%
  • शेती - १२%
  • देशांतर्गत काम - ८%
  • इतर - ११%

कुठे सर्वाधिक सक्तीचे श्रम?

  • २०२१ मध्ये आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्रात १.५ कोटी लोकांसह सक्तीच्या मजुरीमध्ये जगणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक होती. 
  • अहवालानुसार, यानंतर युरोप आणि मध्य आशिया येतो. सौदी अरेबिया आणि कतारमधील भारतीय कामगारांसह इतर कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले.

असे होते शोषण

  • तीन वर्षांपूर्वी ६३ लाख लोक व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या परिस्थितीला सामोरे जात होते.
  • या परिस्थितीत पकडलेल्या पाचपैकी जवळपास चारजण (७८ टक्के) मुली किंवा महिला होत्या.
  • याशिवाय नोकरीवरून काढून टाकण्याची भीती निर्माण करून शोषणही केले जाते.
टॅग्स :Labourकामगार