शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारवादी धोरणाला अनेक नागरिकांचा पाठिंबा; रशियाचे गतवैभव मिळविण्याची पुतीन यांची महत्त्वाकांक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:00 IST

रशियातील नागरिकांचे आजच्या रशियापेक्षा पूर्वीच्या सोव्हिएत रशियावरच अधिक प्रेम असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला. त्यामुळे रशियाने आता घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेला त्या देशातून कमी प्रमाणात विरोध होताना दिसतो.

ऑक्सफर्ड : रशियाला पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर  पुतीन यांची महत्त्वाकांक्षा असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. युक्रेन युद्धात विजय मिळाल्यानंतर ते सोव्हिएत रशियातून पूर्वी फुटून निघालेल्या देशांकडेही त्यांची नजर वळण्याची शक्यता आहे असे काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना वाटते.रशियातील नागरिकांचे आजच्या रशियापेक्षा पूर्वीच्या सोव्हिएत रशियावरच अधिक प्रेम असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला. त्यामुळे रशियाने आता घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेला त्या देशातून कमी प्रमाणात विरोध होताना दिसतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या विविध सर्वेक्षणात असे आढळून आले होते की, १९९१ साली सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर त्याबद्दलची आपुलकीची भावना कमी झाली होती. मात्र, सोव्हिएत रशियाबद्दल २०१४ सालानंतर पुन्हा प्रेम उफाळून येण्यास सुरुवात झाली. पुतिन यांच्या लष्कराने क्रिमिया घशात घातला व युक्रेनच्या लुहान्स्क व डोनेत्स्क या प्रांतांमधील बंडखोरांना समर्थन दिले, त्यावेळी या धोरणाला रशियातील अनेक नागरिकांनी पाठिंबा दिला होता. 

लविवमध्ये क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात सहा ठार, ११ जण जखमी -युक्रेनच्या पश्चिम भागातील लविव शहरावर रशियाच्या लष्कराने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये सहा जणांचा मृत्यू व ११ जण जखमी झाले. दक्षिण युक्रेनमध्ये रशियाचे सैनिक नागरिकांचा छळ करत असून, अनेकांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला. या अत्याचारांविरोधात सर्व देशांनी आवाज उठविला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुतीन यांचे स्थान भक्कमऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. स्टीफन व्हाईटफिल्ड यांनी सांगितले की, रशियामध्ये लोकशाही राजवट यावी या विचारसरणीला तेथील अनेक नागरिकांचा विरोध आहे.  युक्रेनला युद्धात अमेरिका, नाटो देश करत असल्यामुळे रशियात त्या देशांविरुद्ध संताप आहे. पूर्वीचा सोव्हिएत रशिया असता तर कोणालाही युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्याची हिंमत झाली नसती असेही मत रशियातील काही नागरिकांनी व्यक्त केले होते. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन