शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सगळे काही ‘मेड इन चायना’, त्यामुळेच भारतात बेरोजगारी; राहुल गांधींचा परदेशातून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 07:22 IST

राहुल गांधी यांचा अमेरिकेतील विद्यार्थी, भारतीयांशी संवाद

वॉशिंग्टन : “जगभरात सर्व काही ‘मेड इन चायना’ आहे. जागतिक उत्पादनात चीनची आघाडी आहे, त्यामुळेच तेथे बेरोजगारीचा प्रश्न कमी आहे. या उलट परिस्थिती पश्चिमी देश आणि भारतात असल्यामुळे तेथे बेरोजगारीची समस्या मोठी आहे”, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतात निर्मितीवर भर द्यायला हवा यावर भर दिला.

अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल म्हणाले की, भारतात कौशल्याची कमतरता नाही, त्याला फक्त निर्मितीशी जोडले तर देश चीनशी स्पर्धा करू शकतो. देशात व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. “तुम्ही १९४०,१८५०, १९६० चा अमेरिका पाहिल्यास लक्षात येईल की, या काळात अमेरिका जगाचे उत्पादन केंद्र होते. सध्या चीनचे त्यावर वर्चस्व आहे. पश्चिमी देश, अमेरिका, भारताने उत्पादन निर्मितीकडे दुर्लक्ष करून ते चीनकडे दिले. उत्पादन निर्मितीतूनच रोजगार निर्मिती होते, भारताला याबाबत विचार करावा लागेल,” असे राहुल म्हणाले. 

भारतीय राजकारणात प्रेम, आदर, नम्रतेचा जाणवतो अभावभारतीय राजकारणात प्रेम, आदर, नम्रतेचा अभाव आहे, अशी खंत राहुल यांनी टेक्सासमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना व्यक्त केली. ‘भारत हा एक विचार आहे’, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारसरणीवरही त्यांनी टीका केली. ‘भारत हा एक विचार आहे, असे आरएसएस मानते, परंतु भारत हा विविध विचारांचा विविधतेने नटलेला देश आहे, असे आम्ही मानतो.आम्ही अमेरिकेसारखेच आहोत, जेथे प्रत्येकाला सहभागाची संधी दिली पाहिजे, असे मानले जाते”, असे ते म्हणाले.

राहुल लोकशाहीवरील काळा डाग : भाजपराहुल गांधी हे भारतीय लोकशाहीवरील काळा डाग आहेत,” अशी टीका अमेरिका दौऱ्यातील त्यांच्या वक्तव्यावरून भाजपने केली. राहुल यांच्यावर लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत गौरव भाटिया यांनी राहुल गांधी हे अपरिपक्व आणि अंशकालीन नेते असल्याची टीका केली.

‘राहुल गांधी आता बनले रणनीतीकार’‘राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत, तर ते आता सखोल विचार असणारे, उच्च शिक्षित रणनीतीकार बनले आहेत,” असे मत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. “राहुल गांधींची विचारसरणी सर्वसमावेशक आहे. त्यांच्याकडे असा दृष्टिकोन आहे की भाजपकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्रसार करण्यात येत असलेल्या दृष्टिकोनापेक्षा तो वेगळा आहे,” असे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा