शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 16:41 IST

इस्रायली लष्कराने रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी एका मशिदीवर हवाई हल्ला केला. आयडीएफने केलेल्या दाव्यानुसार, हमास मशिदी आणि शाळाचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून करत आहे.

इस्रायल लेबनॉनवर सातत्याने जबरदस्त हल्ले करत आहे. इस्त्रायली लष्कराने बेरूतच्या दक्षिण उपनगरावर 30 हून अधिक हवाई हल्ले केले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वात हिंसक हल्ले होते, असे लेबनीज मीडियाने म्हटले आहे. तर आपण हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोला लक्ष्य केल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायली लष्कराने रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी एका मशिदीवर हवाई हल्ला केला. आयडीएफने केलेल्या दाव्यानुसार, हमास मशिदी आणि शाळाचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून करत आहे. या हवाई हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

हिजबुल्लाहचा इस्रायली सेन्यावर हल्ला केल्याचा दावा -हिजबुल्लाहने मनारा येथे इस्रायली सैनिकांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. हिजबुल्लाहने रविवारी उत्तर इस्रायलमधील मनारा येथे इस्रायली सैनिकांवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांसह तीन हल्ले केले. यापूर्वी, हिजबुल्लाहने ब्लिडा येथील खालेट शुएबच्या माध्यमातून लेबनॉनमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या इस्रायली सैनिकांवर हल्ला केल्याचा दावाही केला होता. तेव्हा या हल्ल्यांमुळे इस्रायली सैनिकांना माघार घ्यावी लागली होती, असे हिजबुल्लाहने म्हटले होते.

गाझावरही इस्रायलचे हल्ले सुरूच - संपूर्ण उत्तर गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच आहे. इस्रायली सैन्याने उत्तर गाझाचा मोठा भू-भाग रिकामा करण्यास सांगितले आहे. इस्रायली लष्कराचे अरबी प्रवक्ते अविचाय अद्राई यांनी म्हटले आहे की, "हमासने या भागात दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ते येथील लोकांचे शोषण करत आहेत. याशिवाय ते येथील लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत. इस्रायली सैन्य दहशतवादी संघटनांविरोधात बलपूर्वक कारवाई करत राहील, हे लोक राशीद स्ट्रीट (समुद्र) आणि सलाह अल-दिन स्ट्रीटकडे जाऊ शकतात."

टॅग्स :Israelइस्रायलGaza Attackगाझा अटॅकwarयुद्ध