शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

युरोप : जनजीवन रुळावर येणार, अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:24 IST

अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या घटली

पॅरिस : युरोपमधील जनजीवन पुन्हा एकदा रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काही दिवसात युरोपात हर्ड इम्युनिटी येईल. जर्मनीत नवे रुग्ण वेगाने कमी होत आहेत. फ्रान्समध्ये मेपासून विविध स्तरातील लॉकडाऊन समाप्त करण्यात येणार आहे. स्पेनमधील निर्बंध ९ मेरोजी समाप्त होत आहेत. ब्रिटनमध्ये दुकाने, रेस्टॉरंट यापूर्वीच सुरू झाली आहेत. बेल्जियममध्ये ८ मेपासून रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. ऑस्ट्रियातही सर्व दुकाने १९ मेपासून सुरू होणार आहेत. इस्रायलमध्ये आता मास्क आवश्यक नाही. रेस्टॉरंट, म्युझियम, कॅफे, लायब्ररी मागील आठवड्यातच सुरू झाले आहेत. 

ब्राझिलमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखांवर आहे. फ्रान्समध्ये सक्रिय रुग्ण ९ लाख ४७ हजारांवर आहेत. तुर्कीत ४ लाखांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रशियात सक्रिय रुग्ण २ लाख ६८ हजारांवर आहेत. अमेरिकेतील सक्रिय रुग्णांची संख्या ६७ लाखांवर आहे. स्पेन, जर्मनीतील सक्रिय रुग्ण अनुक्रमे २ लाख ३९ हजार व ३ लाखांवर आहेत. पाकिस्तानात ८९ हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत. जपानमधील सक्रिय रुग्णांची संख्या ५९ हजारांवर आहे. युएईतील सक्रिय रुग्ण १७ हजारांवर, तर सौदीतील सक्रिय रुग्ण ९ हजारांवर आहेत. श्रीलंकेतील सक्रिय रुग्ण ११ हजारांवर आहेत. 

भारतातून आपल्याच देशात परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना होऊ शकतो तुरुंगवास nसिडनी : सध्या भारतात असलेले ऑस्ट्रेलियन नागरिक जर आपल्या देशात परतत असतील तर त्यांना दंड लागू शकतो. तसेच, पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. कारण, ऑस्ट्रेलियातील सरकारने भारतातून ऑस्ट्रेलियात येण्यासाठी अस्थायी बंदी घातली आहे. 

nऑस्ट्रेलियातील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने या आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी आणलेली आहे. भारतात जवळपास ९ हजार ऑस्ट्रेलियन नागरिक राहतात. यातील ६०० लोकांना असुरक्षित श्रेणीत ठेवण्यात आले आहे. 

nऑस्ट्रेलियातील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इतिहासात हे प्रथमच होत आहे की, आपल्याच देशात परतल्यानंतर हा गुन्हा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियातील एक डॉक्टर व्योम शार्मर यांनी म्हटले आहे की, आमचे कुटुंबीय भारतात मृत्युमुखी पडत आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. अशावेळी हा निर्णय घेणे म्हणजे त्यांना संकटात सोडण्यासारखे आहे. 

n१४ दिवसांपूर्वी जो कोणी भारतात गेलेला आहे, त्यांना सध्या देशात प्रवेश मिळणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास पाच वर्षांची शिक्षा अथवा ४८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी म्हटले आहे की, सरकारने हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आहे. भारताला व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किट पाठविण्याबाबत सहमती झाली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाBrazilब्राझील