शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कस्तानात एर्दोगान यांचा पुन्हा वरवंटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:40 IST

संसदीय लोकशाहीतून अध्यक्षीय राजवटीत स्थित्यंतर होत असलेल्या तुर्कस्तानात तय्यीप एर्दोगान सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून मंगळवारी शपथ घेण्याआधी निष्ठेबद्दल शंका असलेल्या १८ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी एकहाती बडतर्फ केले गेले.

अंकारा - संसदीय लोकशाहीतून अध्यक्षीय राजवटीत स्थित्यंतर होत असलेल्या तुर्कस्तानात तय्यीप एर्दोगान सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून मंगळवारी शपथ घेण्याआधी निष्ठेबद्दल शंका असलेल्या १८ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी एकहाती बडतर्फ केले गेले. यात निम्म्याहून अधिक कर्मचारी पोलीस दलातील आहेत.दोन वर्षांपूर्वी सत्ता उलथून टाकण्यासाठी झालेली बंडाळी चिरडून टाकताना त्या वेळी पंतप्रधान असलेल्या एर्दोगान यांनी आणीबाणी पुकारून १.६० लाख सरकारी कर्मचाºयांची अशीच हकालपट्टी केली होती. याखेरीज ५० हजारांहून अधिक नागरिकांना देशद्राहाबद्दल अटक करून त्यांच्यावर खटले सुरू आहेत.दोन आठवड्यापूर्वी झालेल्या संसदीय निवडणुकीत एर्दोगान यांनी बहुमत कायम राखले. एवढेच नव्हे, तर अध्यक्षीय राजवट लागू करण्यासाठी घेतलेले सार्वमतही त्यांनी जिंकले. आता एर्दोगान आधुनिक तुर्कस्तानचे संस्थापक केमाल अतातुर्क यांच्यानंतरचे सर्वात शक्तिमान सत्ताधीश झाले आहेत. मंगळवारी त्यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी व्हायचा आहे व त्याच वेळी आणीबाणीही उठविली जायची आहे. त्याआधी आपले आसन आणखी भक्कम करण्यासाठी एर्दोगान यांनी पुन्हा हा वरवंटा फिरविला आहे.रविवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार विविध विद्यापीठांमधील १९९ अध्यापक व सुरक्षा दलांतील पाच हजारांहून अधिक कर्मचाºयांनाही घरी पाठविण्यात आले. (वृत्तसंस्था)सर्व शक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून एर्दोगान यांचा मंगळवारी शपथविधी व्हायचा आहे. त्याआधी त्यांनी ही साफसफाई केली.

टॅग्स :newsबातम्या