शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"एपस्टीनला कोणत्याही प्रकारे पैसे दिलेले नाहीत"; फोटो अन् वादानंतर बिल गेट्स फाऊंडेशनने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:49 IST

"आम्ही एपस्टीनला कधीही कोणतेही पेमेंट केले नाही आणि त्याच्यासाठी कधी कामही केले नाही," असे फाऊंडेशनने ठामपणे स्पष्ट केले आहे.

जगातील सर्वात मोठी परोपकारी संस्था असलेल्या 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन'चे नाव कुप्रसिद्ध गुन्हेगार जेफरी एपस्टीनशी जोडले गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सार्वजनिक केल्यानंतर फाऊंडेशनने आपली बाजू अधिकृतपणे मांडली आहे. "आम्ही एपस्टीनला कधीही कोणतेही पेमेंट केले नाही आणि त्याच्यासाठी कधी कामही केले नाही," असे फाऊंडेशनने ठामपणे स्पष्ट केले आहे.

नेमका वाद काय? 

गेल्या काही काळापासून बिल गेट्स आणि जेफरी एपस्टीन यांच्या संबंधांबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. एपस्टीन हा लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला गुन्हेगार होता. अमेरिकन न्याय विभागाने लाखो कागदपत्रे प्रसिद्ध केल्यावर समजले की, जगातील अनेक बड्या हस्तींचे एपस्टीनशी संबंध होते. यामध्ये बिल गेट्स यांचे नावही वारंवार समोर येत असल्याने फाऊंडेशनला यावर स्पष्टीकरण देणे भाग पडले आहे.

भेटीमागचे कारण काय होते? 

फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, काही कर्मचाऱ्यांनी एपस्टीनशी संवाद साधला होता. एपस्टीनने असा दावा केला होता की, तो जागतिक आरोग्य आणि विकासासाठी मोठ्या देणगीदारांकडून निधी मिळवून देऊ शकतो. याच शक्यतांची चाचपणी करण्यासाठी फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा केली होती. मात्र, ही चर्चा कधीही पुढे गेली नाही आणि कोणताही निधी कधीही गोळा करण्यात आला नाही.

"ती भेट ही माझी मोठी चूकच!" 

खुद्द बिल गेट्स यांनीही यापूर्वी यावर भाष्य केले आहे. एपस्टीनशी भेटीगाठी करणे ही आपली मोठी चूक होती, असे त्यांनी मान्य केले आहे. केवळ समाजसेवेच्या कामाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आपण त्याला भेटलो होतो, असे गेट्स यांनी वारंवार सांगितले आहे. एपस्टीन २००८ मध्ये दोषी ठरल्यानंतरही गेट्स यांनी त्याच्याशी चर्चा सुरू ठेवली होती, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

फाऊंडेशनला पश्चात्ताप 

फाऊंडेशनने आता स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, "एपस्टीनसारख्या व्यक्तीसोबत फाऊंडेशनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने संवाद साधला, याचा आम्हाला खेद आणि पश्चात्ताप वाटतो." एपस्टीनचा २०१९ मध्ये मॅनहॅटन तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला होता, ज्याला आत्महत्या मानले गेले. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ही जगातील आरोग्य सेवांसाठी सर्वाधिक दान देणारी संस्था आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेचे नाव एका गुन्हेगाराशी जोडले गेल्यामुळे फाऊंडेशनने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय