शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:32 IST

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा स्वतःच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवणार आहे.

Pakistan Election : कुख्यात पाकिस्तानीदहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा, संस्थापक हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद याने 2024 मध्ये होणाऱ्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. तलहा सईदला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. अल्लाह-हू-अकबर तहरीक पार्टीद्वारे तलहा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.

पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निवडणुकांमध्ये कुख्यात दहशतवादी आणि पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेल्या हाफिज सईदचा मुलगा तलहा सहिदने निवडणुकीची कमान हाती घेतली आहे. विशेष म्हणजे हाफिज सईद तुरुंगात असल्याने मुलाकडेच लष्कर-ए-तैयबाचे नेतृत्व आहे. हाफिज सईद असतानाही तो संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता. 

तलहाचे नाव अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असून, तो अनेक दिवसांपासून आपल्या दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे काम करत होता. याआधी हाफिज सईदचा जावई 2018 मध्ये निवडणूक लढला होता. तलहा सईदनेही 2018 मध्ये मूळ गाव सरगोधा येथून निवडणूक लढवली होती. पण, त्या दोघांचा तेव्हा पराभव झाला.

तलहाने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, तलहा सईद उर्फ ​​हाफिज तल्हा सईद, असे त्याचे पूर्ण नाव आहे. तलहा सईदला 2022 मध्ये भारताने दहशतवादी घोषित केले होते आणि त्याच्यावर लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम केल्याचा आणि भारतातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. तलहा सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने अडथळे आणले होते, त्यामुळे त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करता आले नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयTerrorismदहशतवादterroristदहशतवादी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाElectionनिवडणूक