शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:40 IST

श्रीलंकामध्ये लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ इलम (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेच्या काळात भारत व श्रीलंका या दोन देशांचे संबंध कसे होते, याचे विश्लेषण करणाऱ्या दस्तऐवजांच्या दोन फायलींसह १९५ फायली इंग्लंडने नष्ट केल्या.

लंडन -  श्रीलंकामध्ये लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ इलम (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेच्या काळात भारत व श्रीलंका या दोन देशांचे संबंध कसे होते, याचे विश्लेषण करणाऱ्या दस्तऐवजांच्या दोन फायलींसह १९५ फायली इंग्लंडने नष्ट केल्या. याबद्दल संशोधक व पुराभिलेखागार तज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.इंग्लंडच्या पुराभिलेखागार धोरणानूसार, श्रीलंकेमध्ये एलटीटीइच्या कारवाया वाढू लागल्यानंतर १९७८ ते १९८० या कालावधीत त्या देशाच्या लष्कराने इंग्लंडच्या एम१५ व सिक्रेट एअर सर्व्हिसेस (एसएएस) या गुप्तहेर संघटनांशी सल्लामसलत केली होती. १९७९ ते १९८० या कालावधीत भारत व श्रीलंका यांच्यात कसे संबंध होते याबद्दलची कागदपत्रे दोन फायलींमध्ये होती.श्रीलंकेच्या सैन्याने १९८१ साली जाफना येथील ग्रंथालय जाळून टाकले, १९८९ साली जाफनातील वस्तुसंग्रहालय उद््ध्वस्त केले. या घटनांबद्दल सखोल माहितीही त्यात होती. या फायलींबद्दल पत्रकार व संशोधक फिल मिलर यांनी माहितीच्या अधिकारात इंग्लंडच्या परराष्ट्र व राष्ट्रकुल कार्यालयाकडे विचारणा केली होती.इंग्लंडने विविध देशांना केलेली सुरक्षाविषयक मदत, त्या देशात आश्रय मागण्यासाठी अनेक व्यक्तींनी लिहिलेली विनंतीपत्रे, शस्त्रास्त्र खरेदीविक्री व्यवहाराची कागदपत्रे या फायलींमध्ये होती. ती आता नष्ट झाली आहेत.श्रीलंका सैन्याला इंग्लंडकडून प्रशिक्षणएलटीटीईचा उच्छाद सुरू असताना भारतीय शांती सेनेने श्रीलंकेत जाऊन नेमके काय कार्य केले, याबद्दलचा तपशीलही या फायलींमध्ये होता. या फायली नष्ट झाल्याने तामिळी जनतेने आपल्या इतिहासाचे पुरावे गमावले आहेत, अशी प्रतिक्रिया तामिळ इन्फर्मेशन सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष वैरामुत्तू वरदकुमार यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंडIndiaभारतSri Lankaश्रीलंका