शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शेतकरी आंदोलनाचे लोण इंग्लंडपर्यंत; क्रिकेटपटूने दिला मोदी सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 15:57 IST

Farmers Protest in England: आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारची झोप उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वी तीन कृषी कायद्यांविरोधात ठिणगी पडली होती. त्याची आग दिल्लीपर्यंत येईल याची केंद्र सरकारलाही कल्पना नव्हती. मात्र, आता या आंदोलनाचे लोण दिल्लीपर्यंतच न राहता आता इंग्लंडमध्येही पोहोचले आहेत. इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतीयांनी निदर्शने केल्याचा व्हिडीओ इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पनेसरने ट्विट कर मोदी सरकारला इशारा दिला आहे. 

पनेसरने ट्विटरवर हा व्हिडीओ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून पोस्ट केला आहे. ''तुम्ही घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ आली आहे. सिंग (शिख) तुमच्याकडे येत आहेत, जोपर्यंच तुम्ही निर्णय बदलत नाहीत तोवर''. सोबतच माँटीने भारताचे माजी क्रिकेटर हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनाही टॅग केले आहे. 

पनेसरने या आधीही शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे व्हिडीओ शेअर केले होते. 

शेतकऱ्यांना हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाशेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर गर्दी होत असून कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता आंदोलकांना हटविण्यात यावं यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

आंदोलनादरम्यान ८ शेतकऱ्यांचा मृत्यूगेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी  'भारत बंद'ची हाक दिली आहे. 

शेतकरी आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्याला हॉर्ट अटॅक आला होता. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.

दरम्यान, आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत. दुसरीकडे, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज चांदणी चौक आणि सदर बाजार परिसरात पेट्रोलिंग केले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या मोठ्या मार्केटची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये जागोजागी पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंदEnglandइंग्लंड