शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 17:02 IST

भारतीय नागरिक सरबजीत सिंगचा पाकिस्तानी तुरुंगात अंत्यत क्रुरपणे खुन करणाऱ्या अमीर सरफराजची हत्या झाली आहे.

Pakistan News: पाकिस्तानातून मोठी माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराजची लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमीर सरफराज हा तोच व्यक्ती आहे, ज्याने ISI च्या आदेशावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या सरबजीत सिंग यांची अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात अमीर सरफराजने सरबजीतचा पॉलिथिनने गळा आवळून आणि मारहाण करुन निर्घृण खून केला होता. 

1990 मध्ये सरबजीत नकळत पाकिस्तानात पोहोचला सरबजीत सिंग हे भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावचे रहिवासी होते आणि याच गावात शेती करायचे. 30 ऑगस्ट 1990 रोजी ते नकळत पाकिस्तानच्या सीमेत पोहोचले. येथे त्यांना पाकिस्तानी लष्कराने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्यावर लाहोर आणि फैसलाबाद येथील बॉम्बस्फोटांचा आरोप टाकण्यात आला.

त्या बॉम्ब हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. 1991 मध्ये सरबजीत सिंग यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात सरबजीतच्या कुटुंबाने प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढली. पण, 26 एप्रिल 2013 रोजी सरबजीतवर लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केला. अखेर 2 मे 2013 रोजी उपचारादरम्यान सरबजीतचा मृत्यू झाला.

सरबजीत सिंगच्या आयुष्यावर एक चित्रपटही बनवण्यात आला, ज्यात अभिनेता रणदीप हुडाने सरबजीतची आणि ऐश्वर्या रायने सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब