ब्रेक्झिटची पूर्णत: अखेर, अटी झाल्या निश्चित; ईयू-ब्रिटन यांच्यात करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:57 AM2017-12-09T03:57:28+5:302017-12-09T03:57:40+5:30

युरोपीयन युनियन (ईयू) आणि ब्रिटन यांच्यात ब्रिटनने युरोपियन युनियनमधून कोणत्या अटींवर बाहेर पडायचे यावर शुक्रवारी ऐतिहासिक करार झाला.

At the end of the break, the conditions will be fixed; Agreement between EU-UK | ब्रेक्झिटची पूर्णत: अखेर, अटी झाल्या निश्चित; ईयू-ब्रिटन यांच्यात करार

ब्रेक्झिटची पूर्णत: अखेर, अटी झाल्या निश्चित; ईयू-ब्रिटन यांच्यात करार

Next

ब्रुसेल्स : युरोपीयन युनियन (ईयू) आणि ब्रिटन यांच्यात ब्रिटनने युरोपियन युनियनमधून कोणत्या अटींवर बाहेर पडायचे यावर शुक्रवारी ऐतिहासिक करार झाला. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या सकाळी लवकरच चर्चेसाठी येथे दाखल झाल्यावर हा करार झाला.
युरोपियन कमीशनने म्हटले की ब्रिटनने आयरीशची सीमा, घटस्फोट विधेयक आणि नागरिकांचे हक्क यांच्यासह वेगळे होण्याच्या मुद्यांवर पुरेशी प्रगती केलेली आहे. १४ व १५ डिसेंबर रोजी युरोपियन युनियनच्या नेत्यांची शिखर परिषद होत असून तीत ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या वाटाघाटींच्या दुसºया टप्प्यासाठी या कराराने मार्ग मोकळा केला आहे. युरोपियन युनियनचा ब्रिटन जवळपास चार दशकांपासून सदस्य होता व त्यातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनला सार्वमताने जून २०१६ मध्ये परवानगी दिली. परंतु वाटाघाटींचा वेग हळू होता व त्या नेहमी कडवट ठरायच्या. ईयुमधून बाहेर पडणारा तो पहिला देश ठरला. प्राधान्याच्या तिन्ही भागांमध्ये पुरेशी प्रगती साधली गेली असल्याबद्दल कमिशन समाधानी आहे, असे युरोपियन कमिशनने निवेदनात म्हटले.

Web Title: At the end of the break, the conditions will be fixed; Agreement between EU-UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.