शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

इमरान खान पाठवतात अश्लिल मेसेज, महिला नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 10:59 IST

पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानवर पार्टीतीलच एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केले आहेत. ''खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'', असा खळबळजनक आरोप आयेशा गुलालई यांनी केला आहे.

इस्लामाबाद, दि. 2 -  पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानवर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केले आहेत. ''इमरान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'', असा खळबळजनक आरोप आयेशा गुलालई यांनी केला आहे. आरोपांनंतर गुलालई यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे.  

पक्षाला सोडचिठ्ठी देताना आयेशा म्हणाल्या की, ''मला माझा प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. तसेच जेथे सन्मान आणि अब्रूचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मी कोणतीही तडजोड करू शकत नाही''. गुलालई यांनी पत्रकार परिषद घेऊन खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इमरान खान हे पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख आहेत. ते चारित्र्यहिन असल्याचा खळबळजनक आरोप पक्षाच्या नेत्या गुलालई यांनी केला. पक्षातील इतर महिला नेत्यांचाही छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, पक्षाने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

दरम्यान तेहरीक-ए-इन्साफचे नेते शिरीन मजारी यांनी आयेशा यांचे आरोप फेटाळून लावत सांगितले की, ''पक्षानं त्यांना निवडणुकीचं तिकीट दिले नाही, त्यामुळे आयेशा असे आरोप करत आहेत. इमरान खान महिलांचा आदर करतात'', असे सांगत मजारी यांनी या मुद्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे आयेशा यांनी शिरीन मजारी यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे.  यावेळी त्यांनी खैबर पख्तूनख्वातील तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. पक्षाला सोडचिठ्ठी देतानाच त्यांनी आपण पीएमएलएनमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही स्पष्ट केले.