शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अध्यात्मिक सल्ला घेणा-या महिलेबरोबरच इमरान खान यांनी तिसरा विवाह केला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 15:14 IST

यशस्वी क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणारे तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इमरान खान हे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची पाकिस्तानात चर्चा आहे.

ठळक मुद्देएक जानेवारीच्या रात्री इमरान यांनी  लाहोरमध्ये विवाह केला आणि दुस-याच दिवशी इस्लामाबादमध्ये दहशतवादविरोधी कोर्टात हजर राहून त्यांनी जामीन घेतला. तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य मुफ्ती सईद यांनी हा विवाह जुळवला.

इस्लामाबाद - यशस्वी क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणारे तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इमरान खान हे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची पाकिस्तानात चर्चा आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाहोरमध्ये इमरान यांनी विवाह केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. इमरान अध्यात्माच्या विषयावर ज्या महिलेशी सल्ला-मसलत करायचे तिच्याशी लग्न केल्याचे बोलले जात आहे. 

एक जानेवारीच्या रात्री इमरान यांनी  लाहोरमध्ये विवाह केला आणि दुस-याच दिवशी इस्लामाबादमध्ये दहशतवादविरोधी कोर्टात हजर राहून त्यांनी जामीन घेतला असे पाकिस्तानी माध्यांनी म्हटले आहे. तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य मुफ्ती सईद यांनी हा विवाह जुळवला. जेव्हा मुफ्ती सईद यांना इमरानच्या विवाहाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर द्यायचे टाळले. 

पक्षाचे सचिव अवन चौधरी आणि पार्टी प्रवक्ते नईम अल हक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मागच्यावर्षी इमरान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्याने गंभीर आरोप केले होते. इमरान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात असा गंभीर आरोप आयेशा गुलालई या महिला नेत्याने केला होता. क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणा-या इमरानवर राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आरोप झाला होते. यापूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवत असताना इमरानचे अनेक महिलांसोबत नाव जोडले गेले होते. 

जेमिमा खान क्रिकेटला अलविदा केल्यानंतर इमरान खानने 1995 साली ब्रिटनमध्ये रहाणा-या जेमिमा गोल्डस्मिथबरोबर लग्न केले. लंडनमध्ये बराच काळ जेमिमा बरोबर घावल्यानंतर 16 मे 1995 रोजी इमरानने जेमिमाबरोबर लग्न केले. पण नऊवर्षातच त्यांचा संसार मोडला. 

सीत व्हाईट 

1987-88 च्या दशकात इमरान खान सीता व्हाईट या अमेरिकन तरुणीसोबत डेट करत होता. जेव्हा सीता त्याच्यापासून गर्भवती राहिली तेव्हा इमरानने अपत्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. अखेर लॉस एंजिल्स कोर्टाने इमरानचा त्या मुलीचा पिता असल्याचा निकाल दिला. 

झीनत अमान 1980-90 च्या दशकात झीनत अमान बॉलिवूडमधली सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिच्याशी सुद्धा इमरान खानचे नाव जोडले गेले होते. 

बेनझीर भुत्तोख्रिस्टोफर सँडफोर्ड यांनी इमरान खानवर बायोग्राफी लिहीली. त्यामध्ये त्यांनी इमरान खानचे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. कारण दोघेही ऑक्सफोर्डमध्ये एकत्र शिकत होते. 

रेहाम खान इमरान खान यांनी ब्रिटीश पत्रकार रेहाम खानबरोबर दुसरा विवाह केला होता. पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही. रेहामन घटस्फोट घेतला आणि पुन्हा मायदेशी परतली. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खान