शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आता बुर्ज खलिफाचे 'फीमेल' व्हर्जन बांधले जाणार, मॉलमध्ये धावणार इलेक्ट्रिक कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 15:53 IST

Burz Khalifa: बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत.

दुबईमधील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. ही सर्वात उंच इमारत पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या इमारतीच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता दुबईमध्ये बुर्ज खलिफाचे 'फीमेल' व्हर्जन बांधली जाणार आहे. एम्मार आणि नून कंपनीचे संस्थापक मोहम्मद अलब्बर यांनी दुबईत 'फीमेल' बुर्ज खलिफा बांधण्याची घोषणा केली आहे. दुबई क्रीक हार्बर येथे एक नवीन मॉल बांधला जाईल. त्यात कारही चालवल्या जाणार आहेत. या कार इलेक्ट्रिक असतील, असे अलब्बर यांनी शारजाह उद्योजकता महोत्सव 2024 (SEF) मध्ये सांगितले. दरम्यान, कार मॉलमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

एवढेच नाही तर एम्मारकडून एक उंच टॉवरही बांधण्यात येणार आहे. हा टॉवर खूप उंच असणार आहे. मात्र, बुर्ज खलिफा पेक्षा लहान असेल. त्याला मंजुरी मिळाली असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत त्याचा लूक समोर येईल. कंपनी क्रीक टॉवरला बुर्ज खलिफाचे 'फीमेल' व्हर्जन मानते. हे 6 मिलियन चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापेल आणि ते एक 'नवीन शहर' बनेल अशी आशा आहे. 

यावेळी अलब्बर म्हणाले, ही यूएईमधील सर्वात उंच इमारत नसेल. आमच्या कंपनीने त्या ठिकाणी एक किलोमीटर उंच टॉवर बांधण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले. आम्ही हे टॉवर बांधतो कारण आम्ही अपार्टमेंटमधून पैसे कमवतो, जिथून टॉवर पाहता येऊ शकतो. पॅरिसमधील प्रत्येकाला आयफेल टॉवरसमोर अपार्टमेंट हवे आहे. आमच्या इमारती फक्त 50 मजली आहेत मग आम्हाला एक किलोमीटर उंच टॉवर का बांधायचा? अशा परिस्थितीत आम्ही ही योजना रद्द केली. 

सध्या बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारतजगातील सर्व इमारतींमध्ये बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत आहे. हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. बुर्ज खलिफा दुबई येथे आहे. दुबई हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक मानला जातो. या इमारतीची उंची 828 मीटर आहे. ही इमारत 168 मजली आहे. बुर्ज खलिफाचे बांधकाम 21 सप्टेंबर 2004 रोजी सुरू झाले आणि त्याचे अधिकृत उद्घाटन 4 जानेवारी 2010 रोजी झाले. उंचीमुळे, इमारतीच्या वरच्या मजल्यावरील तापमान तळ मजल्यांपेक्षा 15 अंश सेल्सिअस कमी आहे. लोकांनाही या इमारतीचे डिझाईन खूप आवडते. या इमारतीत फक्त ऑफिसच नाही तर सिनेमा हाऊस, मॉल, स्विमिंग पूल आणि मशीदही आहे. त्याच्या बांधकामाची एकूण किंमत 1.5 अब्ज यूएस डॉलर्स होती.

टॅग्स :DubaiदुबईInternationalआंतरराष्ट्रीय